सावधान... इंटरनेटवर पॉर्न सर्च करताय? सर्च करताच १०९० वर पोलिसांकडे जाणार SMS
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 01:31 PM2021-02-13T13:31:17+5:302021-02-13T13:33:46+5:30
ऑनलाईन पॉर्न कंटेन्ट सर्च करतानाच १०९० कडून येणार अलर्ट मेसेज
महिलांसोबत गैरव्यवहार करणाऱ्यांवर आता लगाम घालण्याच्या निर्णय पोलिसांनी घेतला आहे. महिलांसोबत अश्वील कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. महिलांसोबत कोणीही अश्लील कृत्य केलं तर त्याच्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीनं लक्ष ठेवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश सरकारनं १०९० ही सेवा सुरू केली आहे. या द्वारे पोलीस अशा लोकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करणार आहेत जे अशा प्रकारची कृत्य करू शकतात. यासाठी सरकार आणि पोलीस इंटरनेट माध्यमाचा वापर करणार आहे. ऑनलाईन अश्लील बाबी सर्च केल्यास संबंधिता १०९० सावधान होण्याचा अलर्ट देईल. त्यानंतर ही माहिती १०९० वरदेखील दाखल होणार आहे.
"इंटरनेटचा वाढता वापर पाहता १०९० नं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याच माध्यमाचा वापर केला. उत्तर प्रदेशात डिजिटल चक्रव्ह्यू (महिला सुरक्षेसाठी ३६० डिग्री इकोसिस्टम) साठी एक डिजिटल आऊटरिच रोडमॅप तयार केला आहे," अशी माहिती १०९० मध्ये आयोजित एका कार्यक्रमात एडीजी नीरा रावत यांनी दिली. "सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट अंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे. आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे सुरू करण्यात येणार आहे. राज्यात जवळपास ११.६ कोटी इंटरनेट युझर्स आहेत. मुख्य रूपानं ते सर्वच १०९० च्या टार्गेटमध्ये आहेत. महिलांच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम आयडीवर सुरक्षेशी निगडीत मेसेज आणि तरूणांना इशारा देणारा मेसेज पाठवण्यात येणार आहे," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
"या संपूर्ण योजनं नाव आमची सुरक्षा असं ठेवण्यात आलं आहे. या अंतर्गत सर्व इंटनेट युझर्सपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. टप्प्याटप्प्यानं ही योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे. १०९० ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असेल आणि निरनिराळ्या सोशल मीडिया युझर्सपर्यंत याबाबत माहिती पोहोचवली जाईल. सोशल मीडियावरू पाठवण्यात येणारे संदेशही तयार करण्यात आले आहेत," असं नीरा रावत म्हणाल्या.