सावधान, सिम स्वॅपिंगने चोर रिकामी करू शकतात तुमचे बँक खाते!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 05:32 AM2019-01-05T05:32:58+5:302019-01-05T11:09:01+5:30

हल्ली स्मार्ट फोनशिवाय कुणाचे पानही हलत नाही, परंतु थोडासा निष्काळजी केल्यास ही सवय महागात पडू शकते. चोर तुमच्या सिम कार्डमधील सर्व माहिती क्लोन वा स्वॅपद्वारे मिळवून तुमचे बँक खाते रिकामी करू शकतो.

 Be careful, SIM swapping can freeze your thief with your bank account! | सावधान, सिम स्वॅपिंगने चोर रिकामी करू शकतात तुमचे बँक खाते!

सावधान, सिम स्वॅपिंगने चोर रिकामी करू शकतात तुमचे बँक खाते!

नवी दिल्ली : हल्ली स्मार्ट फोनशिवाय कुणाचे पानही हलत नाही, परंतु थोडासा निष्काळजी केल्यास ही सवय महागात पडू शकते. चोर तुमच्या सिम कार्डमधील सर्व माहिती क्लोन वा स्वॅपद्वारे मिळवून तुमचे बँक खाते रिकामी करू शकतो. ते ही अगदी काही मिनिटांत!
सायबर चोरांनी चोरीसाठी ही शक्कल शोधली आहे. कोणत्याही कंपनीचे सिम सायबर चोर सहजपणे स्वॅप करू शकतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी बोलताना केलेली छोटीशी चूक मोठा आर्थिक फटका देऊ शकते. त्यामुळे एखाद्या टेलिकॉम कंपनीच्या नावे फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने सिम कार्ड नंबर विचारला, तर तो सांगू नका. लक्षात ठेवा की, कोणत्याही कंपनीचा अधिकारी अशी खासगी माहिती कधीही मागत नाही. कोणी अशी माहिती विचारत असेल, तर ही धोक्याची घंटा समजावी.

काय आहे सिम स्वॅपिंग?
यात एखाद्या सिम कार्डचे डुप्लिकेट कार्ड तयार केले जाते. कॉल करणारा आपण सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून बोलत असल्याचे सांगून कॉल ड्रॉप, इंटरनेट स्पीड आदी त्रुटी दूर करण्याची बतावणी करीत तुमची माहिती काढून घेतो.
बोलण्यातून ती व्यक्ती युजरचा २० डिजिटचा युनिक नंबर मिळवतो. जो सिम कार्डच्या मागे असतो. त्यानंतर, १ नंबर प्रेस करण्यास सांगितले जाते. ही प्रक्रिया पूर्ण होताच, तुमच्या सिमचे स्वॅपिंग केले जाते. त्यानंतर तुमच्या मोबाइलवर सिग्नल येणे बंद होते व याच नंबरच्या दुसऱ्या सिममध्ये सिग्नल येतात, जे फोन करणाºया व्यक्तीकडे असते.
बहुतांश प्रकरणात स्कॅमरकडे आपला बँकिंग आयडी आणि पासवर्ड असतो. आता त्यांना ओटीपीची गरज असते. तो सिम नंबरवर येतो. ओटीपी येताच आपल्या बँक अकाउंटमधून रक्कम ट्रान्सफर केली जाते.
युरोप व अमेरिकेत २०१३मध्ये सिम स्वॅपिंगच्या अनेक घटना घडल्या. भारतातही सिम स्वॅपिंगने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खात्यातून काढले आहेत. हा सायबर क्राइमचा प्रकार आहे.

Web Title:  Be careful, SIM swapping can freeze your thief with your bank account!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक