CoronaVirus : सावधान! उलट्या, अस्वस्थता आणि पोटदुखी अशी आहेत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 04:09 PM2021-03-25T16:09:41+5:302021-03-25T16:10:13+5:30

CoronaVirus : दिल्लीत कोरोनाचे जवळपास 6.50 लाख प्रकरणे समोर आली आहेत. यातील बहुतेक रुग्णांमध्ये ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला अशी लक्षणे आहेत.

be careful vomiting restlessness and abdominal pain are symptoms of a new corona strain | CoronaVirus : सावधान! उलट्या, अस्वस्थता आणि पोटदुखी अशी आहेत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे 

CoronaVirus : सावधान! उलट्या, अस्वस्थता आणि पोटदुखी अशी आहेत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे 

Next
ठळक मुद्देनवीन कोरोना संसर्गाचा थेट परिणाम घसा, फुफ्फुस आणि मेंदूवर होत आहे, ज्यामुळे रुग्णांमध्ये उलट्या, अस्वस्थता, पोटदुखी आणि अतिसार यासारखी लक्षणे दिसत आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रूग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. कोरोनाची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. नवीन कोरोना संसर्गाचा थेट परिणाम घसा, फुफ्फुस आणि मेंदूवर होत आहे, ज्यामुळे रुग्णांमध्ये उलट्या, अस्वस्थता, पोटदुखी आणि अतिसार यासारखी लक्षणे दिसत आहेत. (be careful vomiting restlessness and abdominal pain are symptoms of a new corona strain)

दिल्लीतील दोन शासकीय रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांना पोटात दुखणे, उलट्या होणे आणि अतिसार सारखी लक्षणे दिसून येत आहेत. कोरोना रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, नवीन कोरोना स्ट्रेनमुळे रूग्णांच्या तब्येतीवर वेगळ्या प्रकारे परिणाम होत आहेत. दिल्लीत कोरोनाचे जवळपास 6.50 लाख प्रकरणे समोर आली आहेत. यातील बहुतेक रुग्णांमध्ये ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला अशी लक्षणे आहेत.

याचबरोबर, आधीसारखेच वास येत नाही आणि अन्नाची चवही लागत नाही, अशी लक्षणे नवीन कोरोना स्ट्रेनच्या रुग्णांमध्ये आढळतात. राजीव गांधी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रुग्णांमध्ये पोटदुखी आणि अस्वस्थतेच्या तक्रारी दिसून आल्या आहेत. यातील बहुतेक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच, आधीच्या आजारानेही ग्रस्त आहेत.

देशात पाच महिन्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारांपेक्षा जास्त
गेल्या 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 53,476 नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर 251 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाची नवीन प्रकरणे आल्यानंतर देशात एकूण संक्रमित रूग्णांची संख्या एक कोटी 17 लाख 87 हजार 534 वर गेली आहे. देशात आतापर्यंत 1 कोटी 12 लाख 31 हजार 650 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 3 लाख 95 हजार 192 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत1 लाख 60 हजार 692 जणांचा मृत्यू झाला आहे.
 

Web Title: be careful vomiting restlessness and abdominal pain are symptoms of a new corona strain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.