वाढती महागाई अनेक वर्षे झेलण्यास तयार राहा; कंपन्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 09:38 AM2022-09-21T09:38:28+5:302022-09-21T09:39:01+5:30
उद्योजक परिषदेत कंपन्यांना इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दीर्घकाळापर्यंत जास्त महागाईसाठी कंपन्यांनी तयार राहणे आवश्यक आहे. याशिवाय पुढील २-३ वर्षांसाठी वस्तूंच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे, असा इशारा फिक्की लीडस् २०२२ या उद्योजकांच्या परिषदेत देण्यात आला.
अभूतपूर्व महागाईचे कारण देशांतर्गत नव्हे तर जागतिक आहे. यामध्ये साथीच्या रोगामुळे आणि युक्रेन-रशिया युद्धामुळे पुरवठा साखळीतील व्यत्यय यांचा समावेश आहे. महागाईमुळे खरेदीवर परिणाम होत असल्याचे हिंदुस्थान युनिलिव्हरचे सीईओ संजीव मेहता यावेळी म्हणाले.
तीन शक्यता कोणत्या?
nभविष्यात महागाई कमी होण्याच्या शक्यतेबद्दल ‘भाकीत करणे खूप कठीण आहे; परंतु आज जगातील तीन संभाव्य शक्यतांसाठी आपल्याला तयार राहावे लागेल.
nपहिली म्हणजे महागाई. दुसरी शक्यता म्हणजे महागाई आणखी वाढू शकते आणि तिसरी शक्यता म्हणजे वस्तूंच्या किमती कमी होऊ शकतात, असा सूर परिषदेत आळवण्यात आला.
आताची महागाई वेगळी का आहे?
ही परिस्थिती पुढील दोन-तीन वर्षे राहू शकते आणि व्यवसाय म्हणून आपल्याला तयार राहावे लागेल. यावेळी महागाईत मोठा फरक आहे. पूर्वी महागाई एक-दोन वस्तूंमध्ये असायची, पण यावेळी ती अनेक वस्तूंमध्ये आहे. त्यामुळेच हा एक मोठा जागतिक मुद्दा बनला आहे असून, चिंता वाढली आहे.
श्रीमंत-गरीब दरी वाढली
कोराना साथीच्या रोगामुळे देशामधील उत्पन्न असमानता वाढली आहे. हे अधिक चिंताजनक वास्तव आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास तीन चतुर्थांश लोक आता अशा देशांमध्ये राहतात जेथे अलीकडच्या वर्षात उत्पन्न असमानता वाढली आहे. कोरोनामुळे १२ कोटी लोक अत्यंत गरिबीत गेले आहेत, असे एचयूएलचे जागतिक सीईओ ॲलन जोप यांनी म्हटले.