रोज रात्री चार तास सासरच्यांची सेवा करायची न्यायालयाची जावयाला शिक्षा-

By Admin | Published: October 28, 2015 10:38 PM2015-10-28T22:38:15+5:302015-10-28T22:38:15+5:30

ठाणे : रोज रात्री चार तास सासरकडील मंडळींची सेवा करून त्यांच्या औषधोपचाराची काळजी घ्यायची आणि त्यानंतर एक तास दर्ग्यामध्ये जाऊन झाडलोट करून त्या परिसरातील झाडांना पाणी घालायचे. हे नित्यक्र माने सलग चार महिने करायचे, अशी शिक्षा ठाणे न्यायालयाने एका आरोपीला दिली आहे. पत्नीला मूल होत नाही म्हणून त्याने तिचा छळ केला होता. त्यामुळे तिने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले होते. त्याप्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. ती आनंदाने भोगून प्रायश्चित्त करेन, असे त्याने न्यायालयात सांगितले आहे. ठाणे न्यायालयातला असा निकाल पहिल्यांदाच लागला आहे.

To be punished for four hours a day, | रोज रात्री चार तास सासरच्यांची सेवा करायची न्यायालयाची जावयाला शिक्षा-

रोज रात्री चार तास सासरच्यांची सेवा करायची न्यायालयाची जावयाला शिक्षा-

googlenewsNext
णे : रोज रात्री चार तास सासरकडील मंडळींची सेवा करून त्यांच्या औषधोपचाराची काळजी घ्यायची आणि त्यानंतर एक तास दर्ग्यामध्ये जाऊन झाडलोट करून त्या परिसरातील झाडांना पाणी घालायचे. हे नित्यक्र माने सलग चार महिने करायचे, अशी शिक्षा ठाणे न्यायालयाने एका आरोपीला दिली आहे. पत्नीला मूल होत नाही म्हणून त्याने तिचा छळ केला होता. त्यामुळे तिने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले होते. त्याप्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. ती आनंदाने भोगून प्रायश्चित्त करेन, असे त्याने न्यायालयात सांगितले आहे. ठाणे न्यायालयातला असा निकाल पहिल्यांदाच लागला आहे.
ठाण्यातील नुरी कम्पाउंड येथे राहणार्‍या रिझवान नुरी याचा विवाह १९९९ साली पुण्यातील शगुप्ता शेख हिच्याशी झाला होता. मात्र, शगुप्ताला मूल होत नाही म्हणून तो तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता.अखेर, हा त्रास असह्य झाल्याने तिने २०१० मध्ये तिने पेटवून घेतले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, पोलिसांनी त्याला अटक केली होती. १४ दिवसांनी त्याला जामीन मिळाला होता. तेव्हापासून सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल मंगळवारी ठाणे सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशा मृदुला भाटिया यांच्यासमोर लागला. सरकारी वकील प्रकाश पुजारी यांनी ११ साक्षीदार तपासून जोरदार युक्तिवाद केला. पत्नीचा असह्य छळ केला म्हणून त्याला १४ दिवसांची सक्तमजुरी आणि ५० हजार रु पये दंडाची शिक्षाही सुनावली. दंडाची रक्कम शगुप्ताच्या वडिलांना द्यावी, असे आदेशही दिले. आरोपीने दर १५ दिवसांनी याबाबत न्यायालयात अहवाल द्यावा, असेही न्यायाधीश भाटिया यांनी या आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: To be punished for four hours a day,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.