तयार राहा ! हवाई दल प्रमुखांचं 12 हजार जवानांना पत्र

By Admin | Published: May 20, 2017 02:16 PM2017-05-20T14:16:38+5:302017-05-20T14:16:57+5:30

पत्रात जवानांना सध्याची वर्तमान परिस्थिती लक्षात घेता शॉट नोटीसवर कोणत्याही ऑपरेशनसाठी तयार राहण्याचा आदेश देण्यात आला आहे

Be ready! Letter to 12,000 jawans of Air Force chief | तयार राहा ! हवाई दल प्रमुखांचं 12 हजार जवानांना पत्र

तयार राहा ! हवाई दल प्रमुखांचं 12 हजार जवानांना पत्र

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - सध्या सर्वच स्तरांवर पाकिस्तानसोबत तणाव वाढत चालला असून यादरम्यान हवाई दलाचे प्रमुख बी एस धनोआ यांनी 12 हजार जवानांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात जवानांना सध्याची वर्तमान परिस्थिती लक्षात घेता शॉट नोटीसवर कोणत्याही ऑपरेशनसाठी तयार राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. 
 
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, 30 मार्च रोजी हे पत्र लिहिण्यात आलं आहे. या पत्रावर बी एस धनवा यांची स्वाक्षरीदेखील आहे. या पत्रात अनेक मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. हवाई दल प्रमुखाने जवानांसाठी पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी फिल्ड मार्शल के एम करियप्पा यांनी 1 मे 1950 आणि जनरल के सुंदरजी यांनी 1 फेब्रुवारी 1986 रोजी अशाप्रकारचं पत्र लिहिलं होतं. 
 
धनोआ यांनी पत्रात Sub-Conventional Threat  चा उल्लेख करत जवानांनी आपल्या प्रशिक्षणावर लक्ष देण्याचा उल्लेख केला आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार या शब्दाचा वापर पाकिस्तानकडून छेडण्यात येणा-या प्रॉक्सी वॉरसाठी केला जातो. 
गेल्या काही वेळापासून जम्मू काश्मीरात लष्करी तळ आणि जवानांवर दहशतवादी हल्ले वाढले आहेत. सीमारेषेवरही वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. वारंवार होणा-या गोळीबारामुळे सीमारेषेजवळील एक हजारहून जास्त लोकांनी स्थलांतर केलं आहे. याशिवाय खो-यात दगडफेक आणि हिंसद निदर्शनेही वाढली आहेत. 
 
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रातून इशारा देण्यात आला आहे की मर्यादित साधनांमध्ये पुर्ण तयारी करुन ठेवा. हवाई दलाकडे लढाऊ विमानांची संख्या कमी आहे. हवाई दलाकडे लढाऊ विमानांच्या  42 स्क्वॉड्रनची आवश्यकता आहे. मात्र त्यांची संख्या कमी झाली असून फक्त 33 राहिले आहेत. 
 

Web Title: Be ready! Letter to 12,000 jawans of Air Force chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.