लोकांची दाढी करणे हे इस्लाम विरोधी - दारुल उलूमचा फतवा
By admin | Published: August 7, 2015 10:46 AM2015-08-07T10:46:56+5:302015-08-07T10:55:40+5:30
उत्तरप्रदेशमधील दारुल उलूम देवबंदने लोकांचे दाढी करणे हे इस्लाम विरोधी कृत्य असल्याचा फतवा काढला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. ७ - उत्तरप्रदेशमधील दारुल उलूम देवबंदने लोकांचे दाढी करणे हे इस्लाम विरोधी कृत्य असल्याचा फतवा काढला आहे. सलूनच्या दुकानात काम करणा-या मुसलमानांनी आता नवीन रोजगार शोधायला हवा असे मतही दारुल देवबंदने मांडले आहे.
मोहम्मद इर्शाद व मोहम्मद फुरकान यांनी मदरसादारुल उलूमला या संदर्भात फतवा काढावी अशी मागणी केली होती. या मागणीनंतर देवबंदचे तीन मौलवी फकरुल इस्लाम, वकार अली व जैनूल कासमी या तिघा मौलवींनी या संदर्भात फतवा काढला आहे. शरिया कायद्यानुसार लोकांची दाढी करणे किंवा त्यांच्या दाढीचे केस कापणे हे इस्लाम विरोधी कृत्य असल्याचे या फतव्यात म्हटले आहे. आम्हाला याविषयी लेखी सूचना मिळालेली नाही, लेखी पत्र आले की पुढे काय काम करायचे यावर विचार करु अशी प्रतिक्रिया सलूनमध्ये काम करणा-या एका मुस्लिम तरुणाने दिली आहे.