मोनालिसासाठी सुंदर डोळे ठरले अडचणीचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 06:46 IST2025-01-20T06:46:22+5:302025-01-20T06:46:41+5:30
Mahakumbh: महाकुंभात रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालिसा ही सध्या चर्चेत आहे. ही तरुणी मध्य प्रदेशातील इंदूरची रहिवासी आहे. तिच्या सुंदर डोळ्यांमुळे ती सध्या चर्चेत आहे. मात्र, या मुलीचे सुंदर डोळे तिच्यासाठी अडचणीचे ठरले आहेत.

मोनालिसासाठी सुंदर डोळे ठरले अडचणीचे
महाकुंभात रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालिसा ही सध्या चर्चेत आहे. ही तरुणी मध्य प्रदेशातील इंदूरची रहिवासी आहे. तिच्या सुंदर डोळ्यांमुळे ती सध्या चर्चेत आहे. मात्र, या मुलीचे सुंदर डोळे तिच्यासाठी अडचणीचे ठरले आहेत. ‘ब्राऊन ब्युटी’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही मुलगी महाकुंभात रुद्राक्ष विकत होती. तिचा व्हिडीओ कोणीतरी व्हायरल केल्यानंतर लोक तिला भेटण्यासाठी, येत आहेत. मोनालिसाचे कुटुंब झोपडपट्टीत राहते. वडिलांनी मोनालिसाला घरी पाठविले असून, दोन बहिणी अजूनही रुद्राक्षाच्या माळा विकत आहेत.