केरळच्या तुरुंगात कैद्यांतर्फे ब्युटी पार्लर
By admin | Published: February 18, 2017 01:36 AM2017-02-18T01:36:29+5:302017-02-18T01:36:29+5:30
तुरुंगातील कैद्यांचे पुनर्वसन करण्याच्या उपक्रमांतून येथील मध्यवर्ती तुरुंगातील कैदी लवकरच ब्युटी पार्लरमध्ये ब्युटिशयनचे काम
तिरूवनंतपूरम : तुरुंगातील कैद्यांचे पुनर्वसन करण्याच्या उपक्रमांतून येथील मध्यवर्ती तुरुंगातील कैदी लवकरच ब्युटी पार्लरमध्ये ब्युटिशयनचे काम करताना दिसतील. केरळ सरकारच्या कारागृह विभागाकडून कैद्यांच्या पुनर्वसनासाठी राबविल्या जाणाऱ्या निरनिराळ््या योजनांचाच हा एक भाग आहे. येथील मध्यवर्ती कारागृहाचे नाव पूजाप्पुरा मध्यवर्ती कारागृह आहे. त्यात खाद्यपदार्थांच्या व्यवसायापासून ते कपडे बनवण्यापर्यंतचे काम चालते. आता या कारागृहात ब्युटी सलोन सुरू होईल. या सलोनमध्ये लोकांना दर्जेदार सेवा रास्त किमतीत उपलब्ध होतील.या तुरुंगाच्या जवळच असलेल्या वापरात नसलेल्या जुन्या कर्मचारी निवासाचा वापर ब्युटी सलोनसाठी केला जाईल. हे निवासस्थान एअर कंडीशन्ड व उत्तम फर्निचर असलेले फक्त पुरुषांसाठीचे ब्युटी पार्लर केले जाईल. केरळमध्ये याआधीही उत्तरेकडील कन्नूर मध्यवर्ती कारागृहात ‘फिनिक्स फ्रीडम एक्स्प्रेशन्स’ या नावाचे फक्त पुरुष कैद्यांनी चालवलेले ब्युटी
पार्लर आहे.