Mumbai Drug Case मध्ये मेहबुबा मुफ्तींचीही उडी; म्हणाल्या, "आडनाव खान म्हणूनच आर्यनला दिला जातोय त्रास"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 03:19 PM2021-10-11T15:19:14+5:302021-10-11T15:20:13+5:30

Aryan Khan : आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आल्या जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती.

Because His Aryan Surname Is Khan Mehbooba Mufti Slams Probe Agency Mumbai Drug Case | Mumbai Drug Case मध्ये मेहबुबा मुफ्तींचीही उडी; म्हणाल्या, "आडनाव खान म्हणूनच आर्यनला दिला जातोय त्रास"

Mumbai Drug Case मध्ये मेहबुबा मुफ्तींचीही उडी; म्हणाल्या, "आडनाव खान म्हणूनच आर्यनला दिला जातोय त्रास"

Next
ठळक मुद्देआर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आल्या जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती.

Cruise drugs case:  ड्रग्स प्रकरणी (Mumbai Drug Bust Case)  अटकेत असलेल्या आर्यन खानच्या (Aryan Khan) अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर बुधवार, १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पुन्हा एकदा त्याला आणि अरबाज मर्चेंटला ऑर्थर रोड तुरुंगात रहावं लागणार आहे. बुधवारी २.४५ वाजता या दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, शाहरूख खानला (Shah Rukh khan) या प्रकरणी अनेक बॉलिवूडच्या दिग्गजांनी पाठिंबा दिला आहे. आता या प्रकरणी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीदेखील उडी घेतली आहे. 

"चार शेतकऱ्यांच्या हत्याचा आरोपी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात कारवाई करण्याऐवजी केंद्रीय एजन्सी २३ वर्षांच्या मुलाला केवळ त्याचं नाव खान आहे म्हणून लक्ष्य करत आहे. व्होट बँकेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मुस्लिमांना लक्ष केलं जात आहे," असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं. 

जामीनासाठी अर्ज 
आर्यन खानच्या वकिलाकडून मुंबईच्या किला कोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, तो शुक्रवारी कोर्टाने फेटाळला. यामुळे आर्यनला शुक्रवारची रात्र इतर कैद्यासोबतच आर्थर रोड जेलमध्ये काढावी लागली. आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सतीश माने-शिंदे यांनी पुन्हा जामिनासाठी पुन्हा नवीन याचिका दाखल केली. मात्र, आता या जामीन अर्जावर १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार असल्याचं न्यायलयाने स्पष्ट केलं आहे. हा खटला आता विशेष एनडीपीएस कोर्टात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच एनसीबीनेदेखील उत्तर देण्यासाठी काही काळाचा अवधी मागितला आहे.

Web Title: Because His Aryan Surname Is Khan Mehbooba Mufti Slams Probe Agency Mumbai Drug Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.