राफेल करारामुळेच केंद्राने सीबीआयला संपवले; यशवंत सिन्हांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 03:53 PM2018-10-24T15:53:03+5:302018-10-24T15:53:35+5:30

नागपूर : देशाची अवस्था बनाना रिपब्लिकसारखी करून ठेवली आहे. देशात कायद्याचे राज्यच राहिलेले नाही. सीबीआय प्रमुखांना कॅबिनेट किंवा पंतप्रधान ...

because of Rafale inquiry government finishes CBI; Yashwant Sinha's allegation | राफेल करारामुळेच केंद्राने सीबीआयला संपवले; यशवंत सिन्हांचा आरोप

राफेल करारामुळेच केंद्राने सीबीआयला संपवले; यशवंत सिन्हांचा आरोप

Next

नागपूर : देशाची अवस्था बनाना रिपब्लिकसारखी करून ठेवली आहे. देशात कायद्याचे राज्यच राहिलेले नाही. सीबीआय प्रमुखांना कॅबिनेट किंवा पंतप्रधान हटवू शकत नाही. केंद्राने सीबीआयला संपविल्याचा आरोप भाजपचे माजी केंद्रीय वित्त मंत्री यशवंत सिन्हा यांनी आज केला.


देशात अराजकता निर्माण झाली असून पंतप्रधान मोदी सरकारचा राफेल कराराच्या चौकशीवरून सीबीआयच्या संचालकांवर राग होता. त्याच रागातून आकसाने ही कारवाई झाल्याचा आरोपही सिन्हा यांनी केला. यावेळी भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हादेखिल उपस्थित होते. नागपूरमधील पत्रकार भवनामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 

यावेळी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले नाराज आशिष देशमुखही उपस्थित होते. 

Web Title: because of Rafale inquiry government finishes CBI; Yashwant Sinha's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.