नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना! नितीन गडकरी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 07:50 AM2023-04-13T07:50:14+5:302023-04-13T07:50:37+5:30

मनुष्य केवळ पदवीनेच पूर्ण होत नसतो. नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना, असा सल्ला बुधवारी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला.

Become a job giver not a job seeker Nitin Gadkari's advice to students | नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना! नितीन गडकरी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना! नितीन गडकरी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

googlenewsNext

नवी दिल्ली :

मनुष्य केवळ पदवीनेच पूर्ण होत नसतो. नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना, असा सल्ला बुधवारी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला.

दिल्लीतील आयोजित केलेल्या परिषदेला संबोधताना ते बोलत होते.चांगुलपणावर कोणाचेच पेटंट नसते. अनेकदा लहान लोकांकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. मी जगातल्या अनेक बड्याबड्या लोकांना भेटलो. ज्यांना मी खूप मोठा समजत होतो. त्यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर ते वाटतात तेवढे मोठे नसल्याचे लक्षात आले. ज्यांना मी दुरून अशिक्षित आणि लहान समजत होतो, त्यांच्याजवळ गेल्यानंतर ते किती मोठे आहेत, याची अनुभवाअंती जाणीव झाली.

...म्हणून मी नावापुढे डॉक्टर लावत नाही
व्यक्तीच्या कामगिरीचे मूल्यांकन होणे महत्त्वाचे असते. मला आतापर्यंत सहा विद्यापीठांकडून डॉक्टरेट मिळाली; पण मी नावापुढे डॉक्टर लावत नाही. कारण मी तेवढा विद्वान नाही, असे माझे प्रामाणिक मत आहे. सुशिक्षित असणे आणि सुसंस्कृत असणे यात फरक आहे, असे गडकरी म्हणाले. मी इंजिनिअर आहे, असा अनेकांचा गैरसमज आहे. मला इंजिनिअर होण्याची इच्छा होती; पण गुण कमी पडल्याने इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळू शकला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना, असा सल्ला त्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला.

Web Title: Become a job giver not a job seeker Nitin Gadkari's advice to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.