व्यसनी बनला प्रामाणिक, परत केले चोरलेले पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:06 AM2017-07-20T02:06:42+5:302017-07-20T02:06:42+5:30

आपल्या अमली पदार्थाच्या व्यसनाची जाणीव झाल्यानंतर सुधारणा झालेल्या एकाने काही वर्षांपूर्वी ज्या महिलेचे पाकीट (वॉलेट) चोरले होते तिचा शोध घेऊन काही रक्कम

Become addicted honest, returned stolen money | व्यसनी बनला प्रामाणिक, परत केले चोरलेले पैसे

व्यसनी बनला प्रामाणिक, परत केले चोरलेले पैसे

Next

आपल्या अमली पदार्थाच्या व्यसनाची जाणीव झाल्यानंतर सुधारणा झालेल्या एकाने काही वर्षांपूर्वी ज्या महिलेचे पाकीट (वॉलेट) चोरले होते तिचा शोध घेऊन काही रक्कम परत केली व पत्र लिहून खेद व्यक्त केला.
फेसबुकवर अ‍ॅमी ख्रिस्तीन या महिलेने १४० डॉलरचे (१०७ पौंड) छायाचित्र पत्रासह टाकले व त्यात लिहिले : ‘‘ओहो, मला तर सध्या धक्काच बसला आहे. काही वर्षांपूर्वी मी पबमध्ये असताना माझे वॉलेट चोरीला गेले होते. मी घरी आल्यावर वॉलेट हरवल्याचे माझ्या लक्षात आले. सगळीकडे शोध घेतला व पबमध्येही फोन केला परंतु ते सापडले नाही. कोणी तरी रात्री आमच्या मोलकरणीकडे एक पाकीट देऊन गेले. माझा शोध घेण्यासाठी कोणी एवढे प्रयत्न केले आहेत यावर माझा विश्वास बसत नाही. अनोळखी गृहस्था, तुझे खूप आभार. माझे डोळे पाणावले आहेत.’’
त्याने पत्रात म्हटले की : ‘‘सुमारे साडेपाच वर्षांपूर्वी मी तुमच्याबाबत फारच भयंकर वागलो. मी तुमचे वॉलेट लांबवले. मला अमला पदार्थांचे व्यसन आहे. हा नाद पूर्ण करण्यासाठी मला जेथून कुठून पैसे मिळतील तेथून हवे असायचे. मी तुम्हाला ओळखतही नाही. वॉलेटमधील बेस्ट बायचे कार्ड आणि रोख रक्कम मी घेतली व वॉलेट फेकले. नंतर मला उपचार घ्यावे लागले व मी मवाळ बनलो. जुन्या वस्तुंमध्ये तुमचे बेस्ट बायचे कार्ड मला साडपले. तुमचे नाव त्यावर पाहिले व तुम्ही कुठे कामाला आहात ते शोधले. एवढी वर्षे तु्म्हाला जो मनस्ताप भोगावा लागला त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. माझ्याकडून जे झाले ते अक्षम्यच आहे, परंतु तुम्हाला छोटीशी का असेना रक्कम परत करायला मला आवडेल. यापुढे मी कधीही कोणाला अशा पद्धतीने दुखावणार नाही.’’

Web Title: Become addicted honest, returned stolen money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.