'सहाव्यांदा MP झालोय, आपण मला शिकवाल...'? घोषणाबाजीपासून रोखल्यानं पप्पू यादव यांचा भाजप खासदारावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 08:31 PM2024-06-25T20:31:31+5:302024-06-25T20:35:10+5:30

दरम्यान, बिहारमधील पूर्णिया येथून विजयी झालेले पप्पू यादव यांनीही शपथ घेतल्यानंतर, काही घोषणा देण्याचा प्रयत्न केला असता, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि प्रोटेम स्पीकर यांनी त्यांना रोखले. यावरून यादव यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांकडे बघत निशाणा साधला. 

'Become an MP for the sixth time, will you teach me Pappu Yadav targets BJP MP kiren rijiju in parliament for preventing him from raising slogans | 'सहाव्यांदा MP झालोय, आपण मला शिकवाल...'? घोषणाबाजीपासून रोखल्यानं पप्पू यादव यांचा भाजप खासदारावर निशाणा

'सहाव्यांदा MP झालोय, आपण मला शिकवाल...'? घोषणाबाजीपासून रोखल्यानं पप्पू यादव यांचा भाजप खासदारावर निशाणा

लोकसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांची शपथ घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातच असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यांमुळे वाद निर्माण झाला. यानंतर लोकसभेच्या रेकॉर्डवरून संबंधित वादग्रस्त विधाने आणि घोषणा हटविण्यात आल्या. दरम्यान, बिहारमधील पूर्णिया येथून विजयी झालेले पप्पू यादव यांनीही शपथ घेतल्यानंतर, काही घोषणा देण्याचा प्रयत्न केला असता, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि प्रोटेम स्पीकर यांनी त्यांना रोखले. यावरून यादव यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांकडे बघत निशाणा साधला. 

सत्ताधारी पक्षाच्या खासदाराकडे बघत निशाणा साधताना पप्पू यादव म्हणाले, "मी 6 व्यांदा खासदार झालो आहे. आपण मला शिकवणार?' शपथ घेण्यासाठी पोहोचलेल्या पप्पू यादव यांच्या गळात #Reneet असे लिहिलेली एक चिठ्ठी दिसून आली. त्यांनी आपल्या शपथेची सुरवात, 'प्रणाम पूर्णिया, प्रणाम बिहार, सलाम बिहार, जोहार बिहार' ने केली

भोजपुरी भाषेतून शपथ, नंतर घोषणाबाजी -
पप्पू यादव यांनी भोजपुरी भाषेतून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर धन्यवाद म्हणताना त्यांनी, नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली. याच बरोबर त्यांनी बिहारला विशेष दर्जा देण्याचीही मागणी केली. तसेच त्यांनी सीमांचल झिंदाबाद, मानवतावाद झिंदाबाद अशा घोषणा दिल्या. यावर प्रोटेम स्पीकर आणि संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांना घोषणाबाजी थांबवण्यास सांगितले.

'आपण कृपेने जिंकले असाल, मी अपक्ष विजयी झालो आहे' -
यावर पप्पू यादव म्हणाले, मी 6 वेळा खासदार म्हणून निवडून आलो आहे. आपण मला शिकवाल? तसेच, पप्पू यादव सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडे इशारा करत म्हणाले, 'आपण कृपेने जिंकला असाल, मी अपक्ष विजयी झालो आहे.' मी चौथ्यांदा अपक्ष निवडणूक जिंकून आलो आहे.

Web Title: 'Become an MP for the sixth time, will you teach me Pappu Yadav targets BJP MP kiren rijiju in parliament for preventing him from raising slogans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.