हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी संघटीत व्हावे
By admin | Published: December 28, 2015 12:05 AM2015-12-28T00:05:23+5:302015-12-28T00:05:23+5:30
जळगाव- हा देश हिंदुंचा आहे. जगात इतर धर्मियांचे राष्ट्र आहेत. तशी देशात हिंदुराष्ट्राची स्थापना होईल. त्यासाठी सर्वार्ंनी तयार राहावे... छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन राष्ट्र रक्षणासाठी सज्ज व्हा, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक आमदार राजासिंह ठाकूर (हैद्राबाद) यांनी रविवारी हिंदु धर्मजागृती सभेत केले.
Next
ज गाव- हा देश हिंदुंचा आहे. जगात इतर धर्मियांचे राष्ट्र आहेत. तशी देशात हिंदुराष्ट्राची स्थापना होईल. त्यासाठी सर्वार्ंनी तयार राहावे... छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन राष्ट्र रक्षणासाठी सज्ज व्हा, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक आमदार राजासिंह ठाकूर (हैद्राबाद) यांनी रविवारी हिंदु धर्मजागृती सभेत केले. शहरातील शिवतीर्थ मैदानावर सायंकाळी सनातन संस्था व हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर सनातन संस्थेचे संत नंदकुमार जाधव, संस्थेच्या प्रसारसेविका स्वाती खाडे, हिंदु जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट उपस्थित होते. डॉ.संजीव हुजुरबाजार व आरती हुजुरबाजार, सपन झुनझुनवाला, नीलेश पवार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. समितीच्या कार्याची माहिती प्रतीक्षा कोरेगावकर यांनी दिली. नेमांडेंचा निषेध का केला नाही?पुरोगामी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी श्रीकृष्ण हे फक्त चालक होते, व्याधीग्रस्त होते, असे वक्तव्य केले. त्यांचा निषेध का करण्यात आला नाही, असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. आमीर खान, शाहरूख खानना इसिसचे झेंडे दिसत नाही...जाधव म्हणाले, देशात असहिष्णुता आहे, असे म्हणणारे आमीर व शाहरूख खान यांना जम्मू काश्मिरात इसिसचे झेंडे फडकविले जातात ते दिसत नाही. बंगाल, बांगलादेश, पाकिस्तानात हिंदुंवर अत्याचार होतात तेदेखील आमीर व शाहरूख यांना दिसत नाही. त्यांच्यामुळेच देशात असहिष्णुता वाढत आहे, असा दावा जाधव यांनी केला. समीर गायकवाड निर्दोष सुटेलपानसरेंच्या हत्येसंबंधी अटकेत असलेला समीर गायकवाड तसेच साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहीत हे निर्दोष सुटतील, असेही जाधव म्हणाले. मानव खोटारडेसनातन संस्थेत युवकांना संमोहीत करून त्यांच्याकडून चुकीचे कार्य करवून घेतले जाते, असा आरोप श्याम मानव यांनी केला. मानव यांचा आरोप चुकीचा असून, त्यांना संमोहन शास्त्राची माहितीच नाही. ते खोटारडे आहे, असेही जाधव यांनी सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादीवर बंदी का नको?पानसरे, दाभोळकर यांच्या हत्येनंतर पोलिसांना दोष देण्याऐवजी सनातन संस्थेवर बंंदीची मागणी करण्यात आली. मग एका खूनाच्या प्रकरणात पद्मसिंग पाटील दोषी असल्याचे सिद्ध झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी का आणली नाही. शिखांची कत्तल केल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसवर बंदी का आणली नाही, केरळात २०० स्वयंसेवकांची हत्या करण्याचा आरोप असलेल्या माकपावर बंदी का नाही, असा प्रश्नही जाधव यांनी उपस्थित केला.