टॅंकर ड्रायव्हर बनला मिस्टर एशिया

By admin | Published: October 27, 2016 06:13 PM2016-10-27T18:13:29+5:302016-10-27T18:13:29+5:30

पाण्याचा टॅंकर चालवणा-याने भारताचं नाव रोशन केलं आहे. फिलिपिन्समध्ये झालेल्या बॉडीबिल्डींग स्पर्धेत त्याने मिस्टर एशियाचा खिताब आपल्या नावावर केला.

Becomes a tanker driver, Mr. Asia | टॅंकर ड्रायव्हर बनला मिस्टर एशिया

टॅंकर ड्रायव्हर बनला मिस्टर एशिया

Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 27 - बंगळुरूमध्ये पाण्याचा टॅंकर चालवणा-याने  भारताचं नाव रोशन केलं आहे. फिलिपिन्समध्ये झालेल्या बॉडीबिल्डींग स्पर्धेत त्याने मिस्टर एशियाचा खिताब आपल्या नावावर केला. जी बाळाकृष्ण असं त्याचं नाव आहे. बाळाकृष्णने अनेक अडचणींवर मात करत केवळ हे यश साध्य केलं नाही तर देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे.    
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यापुर्वीही बाळाकृष्णने गौरवास्पद कामगिरी केली आहे.  2013 मध्ये 14 वर्षांखालील मिस्टर युनिव्हर्स ही स्पर्धा त्याने जिंकली होती तर याच श्रेणीत मिस्टर युनिव्हर्सचं टायटल 2014 ला अॅथेन्समध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपल्या नावावर केलं होतं. 
जर आर्थिक मदत मिळाली तर भविष्यात सातत्याने अशी कामगिरी करू शकतो असं बाळाकृष्ण म्हणाला. या स्पर्धेसाठी घरी रोज 6 तास मेहनत घ्यायचो. मुंबईच्या  संग्राम चौगला आणि पंजाबच्या मनीष कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग केली. रोज 750 ग्रॅम चिकन, 25 अंडे, 300 ग्रॅम भात, याशिवाय प्रोटीनसाठी फळं आणि मासोळी खायचो, तर स्पर्धेसाठी 30 किलो वजन घटवलं होतं असंही त्याने सांगितलं.
 

Web Title: Becomes a tanker driver, Mr. Asia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.