बी.एड परिक्षेला १२ हजार बसले, २० हजार उर्तीण झाले

By Admin | Published: December 13, 2015 02:42 PM2015-12-13T14:42:05+5:302015-12-13T14:50:54+5:30

बी.आर.आंबेडकर विद्यापीठाने घेतलेल्या बी.एडच्या परीक्षेचा धक्कादायक निकाल लागला आहे. निकाल ऐकाल तर, तुम्ही सुध्दा चक्रावून जाल.

The B.Ed. examination got 12 thousand buses, and 20 thousand lacers | बी.एड परिक्षेला १२ हजार बसले, २० हजार उर्तीण झाले

बी.एड परिक्षेला १२ हजार बसले, २० हजार उर्तीण झाले

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

आग्रा, दि. १३ - बी.आर.आंबेडकर विद्यापीठाने घेतलेल्या बी.एडच्या परीक्षेचा धक्कादायक निकाल लागला आहे. निकाल ऐकाल तर, तुम्ही सुध्दा चक्रावून जाल. बी.आर.आंबेडकर विद्यापीठातून परिक्षेला १२, ८०० विद्यार्थी बसले होते पण चक्क २० हजार विद्यार्थी उर्तीण झाले. हे आकडेवारी पाहून थक्क झालेल्या विद्यापीठाच्या अधिका-यांनी अखेरच्या क्षणी निकाल रोखण्याचा निर्णय घेतला. 

विद्यापीठाच्या कुलगुरूनी परिक्षेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बी.एडच्या परिक्षेत मोठया प्रमाणावर अनियमितता झाली असून, या प्रकरणी खासगी महाविद्यालयाशी संबंधित काहीजण तुरुंगात जाऊ शकतात. चौकशीसाठी विद्यापीठाच्या कुलगुरुनी समिती स्थापन केली आहे.  १२,८०० विद्यार्थी परिक्षेला बसले होते. पण अंतिम निकाल आला तेव्हा २०,०८९ विद्यार्थी उर्तीण झाले होते. 
बी.एडच्या निकालाचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले होते. १२,८०० विद्यार्थींची यादी असताना २० हजार उत्तरप्रतिक तपासल्या गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ विद्यापीठाला याची माहिती दिली. कुलगुरुंनी सर्व खासगी महाविद्यालयांना पत्र पाठवून त्यांनी विद्यार्थ्यांची यादी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यातून मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

Web Title: The B.Ed. examination got 12 thousand buses, and 20 thousand lacers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.