चारा बचतीसाठी बळीराजा सरसावला
By Admin | Published: April 10, 2015 11:29 PM2015-04-10T23:29:58+5:302015-04-10T23:29:58+5:30
वडोदबाजार : दुष्काळात पाण्यापाठोपाठ निर्माण होणारी चार्याी टंचाई लक्षात घेता शेतकर्यांनी अधिकाधिक चारा वाया न जाऊ देता बचतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बळीराजा चार्याची कुट्टी (भुस) करीत आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरात कापूस व मका ही दोनच पिके प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घेतली जाते. सलग तीन वर्षांपासून परिसरात दुष्काळाचे चटके सोसावे लागत आहे. अशातच गत महिनाभरापासून गोवंश हत्या बंदी झाल्याने बाजारात विक्रीस येणार्या जनावरांची विशेषत: म्हातार्या बैलांची संख्या झपाट्याने घटली आहे. त्यामुळे शेतकर्यांना अशी जनावरे स्वत:लाच सांभाळावी लागणार असल्याने चारा जमवाजमव करण्यावर बळीराजाने जोर दिला आहे. मक्याचा चारा तसाच जणावरांना टाकल्यास जनावरे चार्याचे केवळ पाचट काढून खातात. त्यामुळे मक्याचे ताट तसेच वाया जाते. यामु
व ोदबाजार : दुष्काळात पाण्यापाठोपाठ निर्माण होणारी चार्याी टंचाई लक्षात घेता शेतकर्यांनी अधिकाधिक चारा वाया न जाऊ देता बचतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बळीराजा चार्याची कुट्टी (भुस) करीत आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरात कापूस व मका ही दोनच पिके प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घेतली जाते. सलग तीन वर्षांपासून परिसरात दुष्काळाचे चटके सोसावे लागत आहे. अशातच गत महिनाभरापासून गोवंश हत्या बंदी झाल्याने बाजारात विक्रीस येणार्या जनावरांची विशेषत: म्हातार्या बैलांची संख्या झपाट्याने घटली आहे. त्यामुळे शेतकर्यांना अशी जनावरे स्वत:लाच सांभाळावी लागणार असल्याने चारा जमवाजमव करण्यावर बळीराजाने जोर दिला आहे. मक्याचा चारा तसाच जणावरांना टाकल्यास जनावरे चार्याचे केवळ पाचट काढून खातात. त्यामुळे मक्याचे ताट तसेच वाया जाते. यामुळे प्रचंड प्रमाणात चार्याची नासाडी होते. त्यामुळे शेतकर्यावर लवकर चारा शोधण्याची वेळ येऊन ढेपते. बागायत नसल्याने हिरवा चारा मिळणेही पुरापस्थ आहे. त्यामुळे शेतकर्यांनी मक्याच्या चार्याचे भुस करून साठवण्यावर भर दिला आहे. चार्याचे भुस केल्याने जनावरेही तो व्यवस्थीत खातात शिवाय भुस वाया जात नाही. नसता जणावरे चारा पायाखाली घेऊन तुडवतात. त्यामुळे चार्याची नासाडी होते. ट्रॅक्टरवरील यंत्राद्वारे शेतकरी मका चार्याची कुट्टी करुन घेत आहे. नंतर कुट्टी केलेला चारा (भुस) एका ठिकाणी साठवून तो पत्र्याखाली झाकून ठेवत असल्याने पावसापासून त्याचे संरक्षण होते. यंदा अवकाळी पावसामुळे बर्याच शेतकर्यांनी गहू हार्वेस्टर यंत्राने मळणी केल्याने भुस वाया गेले आहे. पावसाळुयात हेच भुस जनावरांच्या खाण्यात उपयोगात येते.