गोमांस बाळगणाऱ्याला तीन वर्षांचा कारावास
By admin | Published: May 9, 2016 03:11 AM2016-05-09T03:11:06+5:302016-05-09T03:11:06+5:30
गोमांस जवळ बाळगल्याबद्दल स्थानिक न्यायालयाने रफीक इल्यासभाई खलिफा (३५) या इसमास तीन वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावला आहे.
Next
सुरत : गोमांस जवळ बाळगल्याबद्दल स्थानिक न्यायालयाने रफीक इल्यासभाई खलिफा (३५) या इसमास तीन वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावला आहे.
गानदेवी न्यायदंडाधिकारी सी. वाय. व्यास यांनी खलिफास गुजरात प्राणिसंवर्धन कायद्यांतर्गत ही शिक्षा ठोठावली. यानुसार, गुजरातमध्ये गोमांसजवळ बाळगणे, विकत घेणे, विकणे किंवा वाहतूक करण्यास बंदी आहे. ‘गाईशी धार्मिक भावना जुळलेल्या आहेत. अशा गुन्ह्यामुळे समाजातील शांतता भंग होण्याची भीती आहे. आरोपीला कारावासाची शिक्षा दिली, तर असा गुन्हा न करण्याचे उदाहरण इतरांपुढे ठेवता येईल,’ असे न्या. व्यास म्हणाले.