'बीफ करी'प्रकरण : हिंदू सेनेचा प्रमुख विष्णु गुप्ताला अटक
By admin | Published: October 28, 2015 06:12 PM2015-10-28T18:12:17+5:302015-10-28T18:24:12+5:30
नवी दिल्लीतील केरळ हाऊसमध्ये बीफ करी (गोमांस) वाढण्यात आल्याची चुकीची माहिती दिल्याप्रकरणी हिंदू सेनेचा प्रमुख विष्णु गुप्ता याला दिल्ली पोलीसांनी अटक केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - नवी दिल्लीतील केरळ हाऊसमध्ये बीफ करी (गोमांस) वाढण्यात आल्याची चुकीची माहिती दिल्याप्रकरणी हिंदू सेनेचा प्रमुख विष्णु गुप्ता याला दिल्ली पोलीसांनी अटक केली आहे.
केरळ हाऊसमध्ये 'बीफ करी' वाढण्यात येत असल्याची तक्रार विष्णु गुप्ताने दिली दाखल केली होती. त्यानुसार दिल्ली पोलीसांनी या ठिकाणी कारवाई केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी पोलिसांच्या या कारवाईला छापा असा उल्लेख करत ही घटना दुर्देवी असल्याचे सांगितले. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पोलीस कारवाईचा निषेध करत पोलीस आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. केरळ हाऊसनेही 'बीफ करी' वाढण्यात आल्याचा आरोप फेटाऴून लावत या ठिकाणी 'बीफ करी' वाढण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, याप्रकरणी आज दिल्ली पोलीसांनी 'बीफ करी'प्रकरणी चुकीची माहिती दिल्याच्या आरोपावरुन हिंदू सेनेचा प्रमुख विष्णु गुप्ता याला अटक केली असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १०७ आणि १५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.