बीफ खाणारे म्हणत 15 वर्षाच्या मुलाची ट्रेनमध्ये चाकूने भोसकून हत्या

By admin | Published: June 24, 2017 02:01 PM2017-06-24T14:01:55+5:302017-06-24T14:01:55+5:30

दिल्लीहून मथुरेकडे जाणाऱ्या पॅसेंजरमध्ये १५ वर्षांच्या मुलाची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली आहे.

Beef eaters say that a 15-year-old boy was stabbed to death by a knife | बीफ खाणारे म्हणत 15 वर्षाच्या मुलाची ट्रेनमध्ये चाकूने भोसकून हत्या

बीफ खाणारे म्हणत 15 वर्षाच्या मुलाची ट्रेनमध्ये चाकूने भोसकून हत्या

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 24- दिल्लीहून मथुरेकडे जाणाऱ्या पॅसेंजरमध्ये १५ वर्षांच्या मुलाची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली आहे. वल्लभगडमधील खंदावली गावातील जुनैद, हाशिम, शाकिर मोहसिन आणि मोईन हे गुरुवारी रात्री ईदनिमित्त खरेदी करून दिल्लीहून परतत होते. त्यादरम्यान तुघलकाबाद स्टेशनवरून काही जण पॅसेंजर गाडीत चढले. बसण्याच्या जागेवरून त्यां ट्रेनमध्ये चढलेल्या टोळक्याने या चौघांशी वाद घातला. मोहसिन आणि इतरांनी त्यांना विरोध केला. त्यावेळी तरुणांनी बीफ बाळगल्याचा आरोप करत चौघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. गाडीत बसलेले इतर तरुण नंतर एकत्र आले आणि त्यांनीसुद्धा मारहाण करण्यास सुरुवात केली. ट्रेनमध्ये चढलेल्या त्या टोळीपैकी दोघांनी चाकूनं मोहसिन, जुनैद, हाशिम, मोईनवर वार केले होते. त्यात १५ वर्षांच्या जुनैद खान याचा मृत्यू झाला आहे. द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. 
 
"पॅसेंजरमधून प्रवास करणाऱ्या टोळक्यानं आमच्या कपड्यावरून आम्ही मुस्लिम आहोत हे ओळखलं आणि टोमणे मारायला सुरुवात केली होती. त्यानंतर बीफ खाणारे म्हणून आरोप करत मारहाण करायला सुरुवात केली, अशी माहिती मारहाणीत मृत्यू झालेल्या जुनैदच्या भावाने इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिली आहे. 
 
त्या टोळीतील तरुणांनी आमच्या डोक्यावरील टोपी काढून फेकली. त्यानंतर माझ्या भावाची दाढी खेचायला लागले. बीफ खाणारे असं म्हणत आम्हाला मारहाण करायला सुरुवात केली. जेव्हा वल्लभगडला गाडी पोहोचली त्यानंतर त्या लोकांनी चाकू बाहेर काढले. त्यांच्यापैकी एका जणाने माझ्या भावावर चाकूने वार केले आणि त्यानंतर हाशिम, आणि माझ्यावर हल्ला केला. त्यानंतर शाकिरवरच्या छातीवर त्यांनी वार केले.  त्यानंतर आसोटी स्टेशनजवळ शाकिर आणि जुनैदला धावत्या गाडीतून फेकून दिलं. तेथे  इतर प्रवाशांच्या मदतीनं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण हॉस्पिटलमध्ये नेत असताना जुनैदचा मृत्यू झाला. दरम्यान इतर जखमींवर एम्समध्ये उपचार सुरु आहेत. 
दोन्ही गटांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता. तेव्हा बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं आणि त्यात एकाची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली, असं पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटलं आहे. 
 

Web Title: Beef eaters say that a 15-year-old boy was stabbed to death by a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.