केंद्र सरकारला तीन वर्ष झाल्यानिमत्त भाजपा नेत्याची बीफ पार्टी
By admin | Published: June 1, 2017 04:50 PM2017-06-01T16:50:58+5:302017-06-01T16:50:58+5:30
केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमत्त मेघालयातील भाजपाने बीफ पार्टीचे आयोजन केले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमत्त मेघालयातील भाजपाने बीफ पार्टीचे आयोजन केले आहे. संपूर्ण देशभरात भाजप गोमांस विक्री, अवैध कत्तलखान्यांविरोधात भूमिका घेत असताना मेघालयातील भाजपाच्या नेत्याने केलेल्या बीफ पार्टीच्या घोषणेमुळे राजकीय वर्तूळात विविध चर्चेला उधान आले आहे. दी टेलीग्राफच्या वृत्तानुसार, बीफ पार्टीचे आयोजन करण्याची घोषणा करणारे भाजप नेते बाचू चामबुगॉन्ग माराक यांना पक्षातून निलंबित केले जाण्याची शक्यता आहे.
उत्तर गारो हिल्सचे अध्यक्ष असलेल्या बाचू यांनी बुधवारी फेसबुकवर एक बॅनर पोस्ट केला होता. गारो हिल्स भाजप नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होण्याचा आनंद साजरा करण्यासाठी बिची-बीफ पार्टीचे आयोजन करेल, असा मजकूर पोस्टवर लिहिण्यात आला होता. त्यामुळे गोमांसाबद्दल भाजपची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ईशान्य भारतातील भाजपच्या नेत्यांनी याआधीदेखील गोमांसाबद्दल पक्षाच्या अगदी उलट भूमिका घेतली आहे.
ईशान्य भारतात (मेघालय, मिझोरम, नागालँड) ख्रिस्ती धर्मीयांची संख्या जास्त आहे तसेच येथे नागरिक मोठ्या प्रमाणात बीफ खातात.