'बीफ' वाहतूक करणा-या दोघांना खायला लावलं शेण

By admin | Published: June 28, 2016 12:40 PM2016-06-28T12:40:04+5:302016-06-28T12:40:04+5:30

'बीफ'ची वाहतूक करत असल्याच्या संशयातून गो रक्षक दलाच्या सदस्यांनी दोघांना गायीचे शेण मिसळलेला पदार्थ जबरदस्तीने खायला भाग पाडल्याची एक घटना हरयाणामध्ये समोर आली आहे.

The 'beef' transporters feed on both of them | 'बीफ' वाहतूक करणा-या दोघांना खायला लावलं शेण

'बीफ' वाहतूक करणा-या दोघांना खायला लावलं शेण

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २८ - 'बीफ'ची वाहतूक करत असल्याच्या संशयातून गो रक्षक दलाच्या सदस्यांनी दोघांना गायीचे शेण मिसळलेला पदार्थ जबरदस्तीने खायला भाग पाडल्याची एक घटना हरयाणामध्ये समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. 
 
गुरगाव गो रक्षक दलाचा अध्यक्ष धर्मेंद यादवने १० जून रोजी रिझवान आणि मुख्तियार या दोघांना 'पंचगाव्य' खायला लावल्याची कबुली दिली. गो रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना बीफची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर कुंडली-मानेसर पालवल एक्सप्रेस वे वर कार्यकर्त्यांनी एक गाडी पकडली.  
 
या गाडीमध्ये ७०० किलो बीफ सापडले. जे मेवाटहून दिल्लीला नेण्यात येत होते. आम्ही सात कि.मी.पर्यंत गाडीचा पाठलाग करुन बंडारपूर सीमेजवळ गाडी थांबवली. त्यांच्या गाडीत ७०० किलो बीफ होते असे यादवने सांगितले. त्यांना शुद्ध करण्यासाठी आणि धडा शिकवण्यासाठी आम्ही त्यांना जबरदस्तीने पंचगाव्य खायला लावले असे धर्मेंद यादवने सांगितले. दोघांना आपल्या पद्धतीने शिक्षा दिल्यानंतर गो रक्षक दलाच्या सदस्यांनी त्यांना फरीदाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले. 

Web Title: The 'beef' transporters feed on both of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.