दिल्ली विद्यापीठात चक्क 'बिअर'चं झाड, रोज मिळते 10 लिटर बिअर
By admin | Published: March 24, 2017 06:18 AM2017-03-24T06:18:09+5:302017-03-24T06:59:01+5:30
येथे अनेकदा बिअर पिण्यासाठी मोठी झुंबड उडते, मोठी रांग लांगलेली असते. गेल्या अनेक महिन्यांपासून या झाडातून रोज 10 लिटर बिअर निघत आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - दिल्ली विद्यापीठाच्या(डीयू) नॉर्थ कॅम्पसमधून एक अचंबित करणारी घटना समोर आली आहे. येथे असलेल्या कडुनिंबाच्या झाडातून बिअरची चव असलेलं द्रव बाहेर येत आहे. 'निम बिअर' म्हणून लोकंही ते आवडीने पित असून कॅम्पसच्या बाहेरुनही लोकं येथे निम बिअर पिण्यासाठी येत असल्याचं कॅम्पसमधील मुख्य माळी महेश प्रसाद यांनी सांगितलं.
'या झाडातून पांढ-या रंगाचं रस बाहेर पडत असून बिअर प्रमाणेच त्याची नशा आहे. गेल्या वर्षीपासून हा प्रकार सुरू आहे' असं प्रसाद यांनी सांगितलं. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून या झाडातून निम बिअर बाहेर पडत आहे. येथे अनेकदा बिअर पिण्यासाठी मोठी झुंबड उडते, मोठी रांग लांगलेली असते. गेल्या अनेक महिन्यांपासून या झाडातून रोज 10 लिटर बिअर निघत आहे. एकही थेंब वाया जाऊ नये यासाठी कोणीतरी ज्या फांदीतून पांढरा रस बाहेर येत आहे तेथे बादली बांधून ठेवली आहे, तर एक व्यक्ती झाडावर चढून बाटलीत भरून बिअर देत असतो.
विशेष म्हणजे कॅम्पसमध्ये 50 वर्षांहून जुनी अशी 15 कडुनिंबाची झाडं आहेत, पण अशा प्रकारचा द्रव केवळ या एकाच झाडातून येत आहे. दिल्लीतील अशाप्रकारची ही पहिलीच घटना असल्याचं दिल्ली विद्यापीठात 'एनव्हायरनमेंट मॅनेजमेंट ऑफ डीग्रेडेड इकोसिस्टम्स'चे प्राध्यापक सी.आर. बाबू म्हणाले. डीयूच्या 'एनव्हायरनमेंट स्टडीज' विभागाकडून यावर अभ्यास सुरू करण्यात आला आहे.
त्या द्रवात काही औषधी गुण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर ते झाड रोगी असून त्यातून येणारं द्रव हानीकारक ठरू शकतं अशाही प्रतीक्रीया उमटत आहेत.