मतदानाला जाण्यापूर्वी एक महत्वाचे काम करा...; निवडणूक आयोगाचे मतदारांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 01:57 PM2024-03-20T13:57:18+5:302024-03-20T13:58:58+5:30
निवडणूक आयोगही सज्ज झाला आहे. आता मतदारांनाही सज्ज व्हायची वेळ आली आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. देशभरातील १०२ मतदारसंघांमध्ये आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांची घोषणा होत आहे. उमेदवार प्रचार करू लागले आहेत. अशावेळी निवडणूक आयोगही सज्ज झाला आहे. आता मतदारांनाही सज्ज व्हायची वेळ आली आहे. यासाठी निवडणूक आयोगाने मतदानापूर्वी एक महत्वाचे काम करण्यास सांगितले आहे.
मतदारांनी त्यांचे मतदान ओळखपत्र आधार कार्डसोबत लिंक करण्यास सांगितले आहे. हे सक्तीचे नसले तरी निवडणुकीत घोळ होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे करणे गरजेचे आहे. यामुळे फेक मतदान, एकाच व्यक्तीचे अनेक मतदारसंघांत मतदान आदी गोष्टी टाळता येणार आहेत.
यासाठी काय करावे लागेल?
- यासाठी तुम्हाला एनव्हीएसपीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे किंवा व्होटर सर्व्हिस पोर्टलवर जावे लागणार आहे.
- जर रजिस्टर केलेले नसेल तर करावे लागणार आहे. जर केले असेल तर मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करावे लागणार आहे.
- रजिस्टर नसाल तर साईन अप करावे लागणार आहे. मोबाईल, कॅप्चा कोड ओटीपी टाकून तुम्हाला रजिस्टर करता येणार आहे.
- लॉगिन झाल्यावर आधार कनेक्शन पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून Form 6B भरावा. यानंतर आधार कार्ड आणि व्होटर आयडी लागणार आहे.
- यानंतर मतदार ओळखपत्रावरील EPIC नंबर टाकून तुम्ही व्हेरिफाय आणि फिल फॉर्मवर क्लिक करावे. यानंतर भआषा निवडून तुम्ही अर्ज भरू शकता. नेक्स्ट ऑप्शन क्लिक केल्यावर गरजेची माहिती भरावी लागणार आहे.