Corona Vaccination: चौथ्या लाटेआधीच! आता ५ ते ११ वर्षांमधील मुलांचे लसीकरण; Corbevax च्या मंजुरीसाठी शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 10:49 PM2022-04-21T22:49:35+5:302022-04-21T22:57:33+5:30
5 ते 12 वयोगटातील मुलांसाठीच्या लसीचा डेटा आणि वापर यावर चर्चा करण्यासाठी पॅनेलची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत लसीबाबत केलेल्या शिफारशी आता SEC ने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे पाठवल्या आहेत.
देशात काही राज्यांत कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त होत असताना एक महत्वाची बातमी हाती आली आहे. नवा व्हायरस लहान मुलांना अधिक संक्रमित करू लागला आहे, यातच ५ ते ११ वर्षे वयाच्या मुलांसाठी लस उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने (डीसीजीआय) च्या विशेष पॅनेलने बायोलॉजिकल ईच्या कॉर्बेवैक्स (Corbevax) लसीला आतत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे. यामुळे या लसीला मंजुरी मिळाल्यास बुस्टर डोसच्या साथीने कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेला येण्याआधीच संपविण्याची शक्ती मिळणार आहे. पीटीआयने सूत्रांच्या मदतीने ही माहिती दिली आहे.
5 ते 12 वयोगटातील मुलांसाठीच्या लसीचा डेटा आणि वापर यावर चर्चा करण्यासाठी पॅनेलची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत लसीबाबत केलेल्या शिफारशी आता SEC ने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे पाठवल्या आहेत. डीसीजीआयने मंजुरी दिल्यानंतर लगेचच केंद्रीय आरोग्य मंत्रालयही या लसीच्या वापराला मंजुरी देणार आहे.
दिल्ली, गाझियाबाद, नोएडा येथे लहान मुलांमध्ये कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असताना 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास सरकारी पॅनेलने मंजुरी दिली आहे. हा मोठा दिलासा ठरणार आहे. दिल्लीत आज 965 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 635 बरे झाले आहेत. 1 मृत्यू झाला आहे.