आझाद हिंद सेनेच्या सैनिकावर भीक मागण्याची पाळी
By admin | Published: March 16, 2016 10:23 AM2016-03-16T10:23:43+5:302016-03-16T11:09:11+5:30
आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणा-या एका सैनिकावर आज दारोदार भटकून भीक मागून दिवस ढकलण्याची वेळ आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणा-या एका सैनिकावर आज दारोदार भटकून भीक मागून दिवस ढकलण्याची वेळ आली आहे. ९० वर्षांच्या श्रीपत आल यांच्यावर आज भीक मागण्याची पाळी आली आहे.
श्रीपत लहान असताना त्यांच्या वडिलांकून महाराणी लक्ष्मीबाई, चंद्रशेखर आजाद, भगत सिंग आणि सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यलढयासाठी उभारलेल्या कथा ऐकायचे. लहानपणीच स्वातंत्र्य सैनिकांच्या संपर्कात राहिल्यामुळे त्यांच्यात देशभक्तीची भावना जागृत झाली.
एकदा सुभाषचंद्र बोस झांसी येथे आले होते. त्यांचे भाषण ऐकून श्रीपत इतके प्रभावित झाले की, त्यांनी आझाद हिंद सेनेत जाण्याचा निर्णय घेतला. १९४३ साली श्रीपत आझाद हिंद सेनेत सहभागी झाले. श्रीपत यांच्याकडे सात एकर जमिन होती. मात्र त्यांच्या मुलाने सर्व मालमत्ता दारु आणि जुगाराच्या नादात विकून टाकली.
जो पर्यंत शरीराने साथ दिली तोपर्यंत त्यांनी शेतात मजूरी केली. काबाडकष्ट करुन पोट भरले पण आता शरीर साथ देत नसल्यामुळे त्यांना आता भीक मागावी लागत आहे. ९० वर्षांचे श्रीपत पत्नी सोबत हंसारी भागातील एका झोपडपट्टीत रहातात.