ही नव्या परंपरेची सुरुवात, विरोधी पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा
By admin | Published: January 31, 2017 11:58 AM2017-01-31T11:58:20+5:302017-01-31T12:12:50+5:30
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महिना आधी सुरू होत असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन ही नव्या परंपरेची सुरुवात
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महिना आधी सुरू होत असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन ही नव्या परंपरेची सुरुवात असून, सर्व राजकीय पक्ष हे अधिवेशन शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
मोदी म्हणाले, "आज एका नव्या परंपरेचा प्रारंभ होत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प एक महिना आधीच सादर होणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पसुद्धा यात समाविष्ट करण्यात आला आहे. संसदेतही त्यावर चर्चा होईल. त्यामुळे येत्या काय फायदे होतील, हेही समोर येईल,"
यावेळी मोदींनी सर्व राजकीय पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, मला आशा आहे की यावेळी सर्व राजकीय पक्ष सभागृहात अभ्यासपूर्ण चर्चा करून सभागृहाला पुढे नेण्यात सहकार्य करतील. अर्थसंकल्पाबाबत संसदेत सकारात्मक आणि विस्ताराने चर्चा होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Pehli baar budget 1st Feb ko ho raha hai, aap sabko yaad hoga humare desh mein pehle budget shaam ko 5 baje hota tha: PM Modi pic.twitter.com/aL0adKaaPo
— ANI (@ANI_news) 31 January 2017
Jab Atal ji ki sarkaar thi tab se use parivartit karke satra shuru hote hi budget shuru hua: PM Modi ahead of #BudgetSessionpic.twitter.com/BKGWUZMjjG
— ANI (@ANI_news) 31 January 2017