पश्चिम बंगालमध्ये सहाव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

By admin | Published: May 5, 2016 07:48 AM2016-05-05T07:48:37+5:302016-05-05T07:49:32+5:30

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पूर्व मिदनापुर आणि उत्तर बंगालच्या कूच बिहार जिल्ह्यातील 25 मतदारसंघात हे मतदान पार पडणार आहे

The beginning of the sixth and final phase of voting in West Bengal | पश्चिम बंगालमध्ये सहाव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

पश्चिम बंगालमध्ये सहाव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

Next
ऑनलाइन लोकमत - 
कोलकाता, दि. 05 - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे.  पूर्व मिदनापुर आणि उत्तर बंगालच्या कूच बिहार जिल्ह्यातील 25 मतदारसंघात हे मतदान पार पडणार आहे. एकूण 6774 मतदान केंद्र उभारण्यात आली असून 58 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 170 उमेदवारांचं भविष्य मतदानपेटीत बंद होणार आहे. यामध्ये 18 महिला उमेदवारांचादेखील समावेश आहे. 170 उमेदवारांपैकी 15 उमेदवार करोडपती आहेत. तर 33 उमेदवारांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यातील काहीजण बलात्कार आणि हत्येच्या गंभीर आरोपांचा सामना करीत आहेत.
 
गेल्या पाच टप्प्यातील मतदानाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. काही ठिकाणी हिंसेच्या घटना झाल्या मात्र मतदान सुरळीत पार पडले होते. आता शेवटच्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडावे यासाठी चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. केंद्रीय दलाच्या 361 तुकड्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या आहे. राज्य पोलीस दलाचे 12 हजार कर्मचारी यावेळी मतदानकेंद्रांवर सुरक्षेवर लक्ष ठेवून असतील. 
 
शेवटच्या टप्प्यातील या मतदानात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे प्रवक्ता शाहनवाज हुसेन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्य कॉंग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सचिव सूर्यकांत मिश्र सहभागी होतील.
 

Web Title: The beginning of the sixth and final phase of voting in West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.