मेहनतीचं फळ! 10 लाखांचं कर्ज काढून 2 भावांनी सुरू केला व्यवसाय; वर्षाला 30 लाखांचा टर्नओव्हर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 05:13 PM2023-03-23T17:13:07+5:302023-03-23T17:14:13+5:30

तरुणांनी स्वत:सोबतच जवळपास 100 बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम केलं आहे.

begusarai two brothers of begusarai started copy making industry | मेहनतीचं फळ! 10 लाखांचं कर्ज काढून 2 भावांनी सुरू केला व्यवसाय; वर्षाला 30 लाखांचा टर्नओव्हर

मेहनतीचं फळ! 10 लाखांचं कर्ज काढून 2 भावांनी सुरू केला व्यवसाय; वर्षाला 30 लाखांचा टर्नओव्हर

googlenewsNext

बिहारमध्ये अधिकाधिक लोकांना उद्योजक बनवण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. राज्य सरकारचे लक्ष आता लोकांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणे हे आहे. जेणेकरून ते इतरांसाठी रोजगार निर्माण करू शकतील. याच दरम्यान बेगुसराय जिल्ह्यातील दोन भावांनी मिळून पुस्तक छापण्याचा उद्योग सुरू केला आणि स्वत:ला स्वयंरोजगाराशी जोडले आहे. याची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया...

तरुणांनी स्वत:सोबतच जवळपास 100 बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम केलं आहे. मुख्यमंत्री अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उद्योजक योजनेतून त्यांना मदत मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेगुसराय जिल्ह्यातील बलिया ब्लॉकचा विवेक कुमार बीपी हायस्कूल बेगुसरायमधून पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर बेरोजगार होता. त्याचवेळी धाकटा भाऊ कृष्ण कुमार हाही बीएस्सीचे शिक्षण घेत होता. 

शिक्षणानंतर दोन्ही भाऊ नोकरीच्या शोधात भटकत होते. मग दोन्ही भावांनी आपापसात विचार केला की काही उद्योग का सुरू करू नये. यानंतर बेगुसराय येथील उद्योग विभागाशी संपर्क साधण्यात आला. मुख्यमंत्री अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उद्योजक योजनेतून उद्योग विभागाकडून 10 लाखांचे कर्ज घेतले. यानंतर पाटण्यात प्रशिक्षण घेतल्यानंतर पुस्तकं छापण्याचे काम सुरू झाले. सध्या वर्षाला 30 लाखांचा टर्नओव्हर आहे. 

दरमहा 1.50 लाख रुपयांपर्यंत कमाई

उद्योग चालवणारे कृष्ण कुमार सांगतात की, त्यांच्या कारखान्यात तयार केलेली प्रत बेगुसराय आणि खगरिया जिल्ह्यात विकली जात आहे. अशा परिस्थितीत ते वार्षिक 30 लाखांची उलाढाल करत आहेत. त्याचबरोबर महिन्याला एक ते दीड लाखाची कमाईही होते. दुसरीकडे, पुस्तकं छापण्याच्या कामाशी संबंधित असलेले राकेश कुमार साह यांनी सांगितले की, ते रोज 500 ते 600 रुपये कमावतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: begusarai two brothers of begusarai started copy making industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.