अज्ञात वाहनाच्या धडकेत आतेभाऊ-मामेभाऊ जागीच ठार

By admin | Published: February 22, 2016 07:28 PM2016-02-22T19:28:24+5:302016-02-22T19:28:24+5:30

जळगाव : भरधाव वेगात जाणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. हा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी (ता.जळगाव) शिवारात असलेल्या खुबचंद सागरमल पेट्रोलपंपासमोर सोमवारी पहाटे साडेपाच वाजेपूर्वी घडला. अपघातात ठार झालेले दोन्ही तरूण एकमेकांचे आतेभाऊ-मामेभाऊ आहेत. अपघातानंतर धडक देणारा वाहन चालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला.

At the behest of an unknown vehicle, Atbhau-Methbhau killed on the spot | अज्ञात वाहनाच्या धडकेत आतेभाऊ-मामेभाऊ जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत आतेभाऊ-मामेभाऊ जागीच ठार

Next
गाव : भरधाव वेगात जाणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. हा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी (ता.जळगाव) शिवारात असलेल्या खुबचंद सागरमल पेट्रोलपंपासमोर सोमवारी पहाटे साडेपाच वाजेपूर्वी घडला. अपघातात ठार झालेले दोन्ही तरूण एकमेकांचे आतेभाऊ-मामेभाऊ आहेत. अपघातानंतर धडक देणारा वाहन चालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला.
वैभव बापूराव पाटील (वय १८, रा.करजगाव, ता.चाळीसगाव) व आशिष रवींद्र पाटील (वय १९, रा.नांदखुर्द, ता.एरंडोल) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. वैभव हा आशिषचा मामेभाऊ तर आशिष हा वैभवचा आतेभाऊ होता. दोघेही (एमएच १९ बीके ८२२१) क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीस बांभोरीजवळ अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. त्यात दोघांच्या डोक्यास गंभीर दुखापत ते जागीच गतप्राण झाले. पहाटेच्या सुमारास महामार्गावर वर्दळ नसल्याने नेमक्या कोणत्या वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली? तसेच दोघेही दुचाकीवरून कोठे जात होते? याबाबची माहिती मिळू शकली नाही. मात्र, अपघातग्रस्त दुचाकी रस्त्यावर ज्या स्थितीत पडलेली होती; त्यावरून जळगावकडून पाळधीच्या दिशेने जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस समोरून धडक दिल्याचे स्पष्ट होते. महामार्गाच्या मध्यभागी दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह सकाळी सात वाजेच्या सुमारास रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आले.
यात्रा पाहायला आला अन्...
दांडी पौर्णिमेनिमित्त रविवारी नांदखुर्द गावात यात्रोत्सव होता. यात्रा पाहण्यासाठी वैभव करजगाव येथून त्याचा मित्र राहुल रामकृष्ण पाटील (रा.करजगाव) याच्यासह दुचाकीने सायंकाळी आत्याकडे नांदखुर्दला आला होता. यात्रोत्सवात रात्री उशिरापर्यंत वैभव व राहुल यांनी आशिष पाटील याच्यासह लोकनाट्याचा कार्यक्रम पाहिला. मध्यरात्रीनंतर एक वाजेच्या सुमारास वैभव आणि आशिषने बाहेर जाण्यासाठी राहुलकडून दुचाकीची चावी मागितली. मात्र, रात्र झाल्याने त्यांना चावी देण्यास नकार देऊन तो झोपण्यासाठी निघून गेला. त्यानंतर दोघांनी दुसर्‍या मित्राकडून दुचाकी घेतली. सकाळी दोघांचा बांभोरीजवळ अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आल्याने गावात शोककळा पसरली. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी जळगावकडे धाव घेतली. दोघेही नांदखुर्द येथून जळगावकडे का आले? याबाबत कोणालाही माहिती देता आली नाही. त्यांचे नातेवाईक किंवा मित्र कुणीही जळगावात राहत नसल्याने त्यांचे इकडे येण्याचे कारण गुलदस्त्यातच आहे.

Web Title: At the behest of an unknown vehicle, Atbhau-Methbhau killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.