भारतीय मालिकांवरील बंदी पाकने घेतली मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 11:57 PM2017-07-18T23:57:53+5:302017-07-18T23:57:53+5:30
भारतीय टीव्ही मालिकांवर घालण्यात आलेली बंदी आता पाकिस्तानमधील न्यायालयाने उठवली आहे. तंत्रज्ञानामुळे देशांमधील अंतर कमी होत असून
नवी दिल्ली : भारतीय टीव्ही मालिकांवर घालण्यात आलेली बंदी आता पाकिस्तानमधील न्यायालयाने उठवली आहे.
तंत्रज्ञानामुळे देशांमधील अंतर कमी होत असून सर्वजण जवळ आले आहेत. अशावेळी
तुम्ही अशी बंधने घालू शकत नाही, असे लाहोर उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
मुख्य न्या. मन्सूर अली शाह यांनी स्पष्ट केले की एखाद्या एखाद्या मालिकेतील काही भाग आक्षेपार्ह वा पाकिस्तानविरोधी असेल तर तो सेन्सॉर करणे शक्य आहे. मात्र सरसकट बंदीची गरज नाही. (वृत्तसंस्था)
आक्षेप कशासाठी?
‘पीईएमआरए’ने बंदी मागे घेतली असून, मालिकांचे प्रसारण सुरू झाले. भारतीय मालिकांवर सरकारचा आक्षेप नाही तर बंदी घालण्याचे कारणच नाही, असेही न्यायालयाने म्हटले.