आश्वासनानंतर तरूणाचे उपोषण मागे
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:14+5:302015-02-14T23:51:14+5:30
अकोले : इंदोरी ते सावंतवाडीसह तालुक्यातील रस्त्यांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी तहसील कचेरीसमोर रुंभोडी येथील युवकाचे सुरु असलेले आमरण उपोषण शनिवारी चौथ्या दिवशी चौकशीचे लेखी आश्वासन मिळाल्या नंतर मागे घेण्यात आले.
Next
अ ोले : इंदोरी ते सावंतवाडीसह तालुक्यातील रस्त्यांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी तहसील कचेरीसमोर रुंभोडी येथील युवकाचे सुरु असलेले आमरण उपोषण शनिवारी चौथ्या दिवशी चौकशीचे लेखी आश्वासन मिळाल्या नंतर मागे घेण्यात आले.रुंभोडी येथील युवक लालू दत्तात्रय पुरी याने हे उपोषण सुरू केले होते. इंदोरी ते सावंतवाडी या रस्त्याची गुणवत्ता कार्यकारी अभियंत्याच्या समितीकडून आठ दिवसात तपासली जाईल, तसेच गुण नियंत्रण पथकाकडून पाहणी होईल, असे लेखी आश्वासन तहसीलदार कैलास पवार व सहाय्यक अभियंता प्रविण नाईक यांनी दिल्यानंतर उपोषण थांबवण्यात आले. उपोषणास रुंभोडी, इंदोरीतील काही गावकर्यांनी भेट देवून तालुका प्रशासनाने ठोस भूमिका न घेतल्यास गावकरी उपोषणास बसतील असा इशारा दिला. त्या नंतर अवघ्या तासाभरातच अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने उपोषणावर तोडगा निघाला. गावकर्यांसमोर चौकशी व्हावी तसेच योग्य चौकशी न झाल्यास पुन्हा सत्याग्रहाच्या मार्गाने लढा देईल, असे उपोषणकर्त्याने स्पष्ट केले. डॉ. अजित नवले, चंद्रभान भोत, मच्छिंद्र धुमाळ, यादव नवले, प्रदिप हासे, महेश नवले यांनी मध्यस्तीची भूमिका केल्याने उपोषण थांबवण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)