मुस्लिम असल्यानेच याकूबला फाशी - ओवेसी बरळले
By Admin | Published: July 24, 2015 08:04 PM2015-07-24T20:04:31+5:302015-07-24T20:08:16+5:30
मुंबईतील १९९३ मधील भीषण बॉम्बस्फोटाप्रकरणी याकूब मेमनच्या फाशी देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आता धार्मिक रंग देण्याचे उद्योग काही नेत्यांनी सुरु केले आहेत.
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. २४ - मुंबईतील १९९३ मधील भीषण बॉम्बस्फोटाप्रकरणी याकूब मेमनच्या फाशी देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आता धार्मिक रंग देण्याचे उद्योग काही नेत्यांनी सुरु केले आहेत. याकूब मेमन हा मुस्लिम असल्याने त्याला फाशी दिली जात आहे असे वादग्रस्त विधान असदूद्दीन ओवेसी यांनी केले आहे.
१९९३ मधील बॉम्बस्फोटाप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेला एकमेव सिद्धदोष गुन्हेगार याकूब मेमनची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. तर राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळून लावल्याने याकूब मेमनला फाशी होणार हे निश्चित झाले आहे. मात्र याकूबच्या फाशीवरुनही राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रकार होत आहे. एमआयएमचे नेते असदुद्दीन यांनी गुरुवारी हैदराबादमधील सभेत याकूब मुस्लिम असल्याने त्याला फाशी होत असल्याचे विधान केले. एवढेच असेल तर राजीव गांधी यांच्या मारेक-यांनाही फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.