पंतप्रधान मोदींचा 'चमचा' असणं चांगलंय - अनुपम खेर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 11:20 AM2018-01-28T11:20:03+5:302018-01-28T11:20:41+5:30
ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंदे समर्थक म्हणूनही ओळख आहे. यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीकाही होत असते. गेल्या वर्षी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) ते अध्यक्ष झाले त्यावेळीही मोदींशी असलेली जवळीक यामागे कारण असल्याची चर्चा होती.
मुंबई: ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंदे समर्थक म्हणूनही ओळख आहे. यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीकाही होत असते. गेल्या वर्षी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) ते अध्यक्ष झाले त्यावेळीही मोदींशी असलेली जवळीक यामागे कारण असल्याची चर्चा होती.
अनुपम खेर नुकतेच इंडिया टीव्हीचा प्रसीद्ध कार्यक्रम आप की अदालतमध्ये आले होते. यावेळी, अनुपम खेर केवळ मोदी सरकारचं गुणगाण गातात असं तुमच्याबाबत विरोधक म्हणतात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना,'' कुणाची बादली बनण्यापेक्षा मोदींचा चमचा असणं चांगलंय'' असं उत्तर त्यांनी दिलं.
अनुपम खेर नेहमी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचं कौतूक करताना दिसले आहेत. अनेकदा सार्वजनिक मंचावरूनही त्यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे. तसंच मोदींच्या विरोधकांवर विशेषतः कॉंग्रस पक्षावरही त्यांनी अनेकदा टीका केली आहे. याच मुद्यावरून इंडिया टीव्हीच्या एका कार्यक्रमात अॅंकर रजत शर्मा यांनी विचारलं, ज्या प्रकारे तुम्ही मोदींचं कौतुक करतात ते पाहून तुम्हाला मोदींचा चमचा म्हटलं जातं. या प्रश्नावर अनुपम खेर थोडे चिडले पण राग आवरत ते म्हणाले, '' बरोबर बोलतात ते, बोलू द्या त्यांना ,दुस-या कुणाची बादली बनण्यापेक्षा मोदींचा चमचा असणं चांगलंय'' .
हा कार्यक्रम अजून टीव्हीवर प्रसीद्ध झालेला नाही. पण या इंटरव्ह्यूची एक झलक रजत शर्मांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘I am better off as chamcha of Modi than a 'balti' of somebody else’ said @AnupamPkher in #AapKiAdalat. Tune in to the entire episode tonight at 10 @indiatvnewspic.twitter.com/qZu5Y2tHJF
— Rajat Sharma (@RajatSharmaLive) January 27, 2018