बेलापूर स्थानकालगत आढळला मृतदेह अज्ञाताची हत्या : मृतदेहाचे तुकडे पिशवीमधून टाकले कचराकुंडीत

By admin | Published: July 7, 2015 10:56 PM2015-07-07T22:56:04+5:302015-07-07T22:56:04+5:30

नवी मुंबई : बेलापूर रेल्वे स्थानकालगतच्या कचराकुंडीत मृतदेहाचे तुकडे आढळल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. ४० ते ४५ वर्षांच्या व्यक्तीचा हा मृतदेह असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. हत्येनंतर तुकडे करून ते प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून टाकण्यात आले होते.

Belapur Location Locals found dead body of unidentified killer: Piece of dead body was taken from the bag by trash | बेलापूर स्थानकालगत आढळला मृतदेह अज्ञाताची हत्या : मृतदेहाचे तुकडे पिशवीमधून टाकले कचराकुंडीत

बेलापूर स्थानकालगत आढळला मृतदेह अज्ञाताची हत्या : मृतदेहाचे तुकडे पिशवीमधून टाकले कचराकुंडीत

Next
ी मुंबई : बेलापूर रेल्वे स्थानकालगतच्या कचराकुंडीत मृतदेहाचे तुकडे आढळल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. ४० ते ४५ वर्षांच्या व्यक्तीचा हा मृतदेह असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. हत्येनंतर तुकडे करून ते प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून टाकण्यात आले होते.
बेलापूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील कचराकुंडीच्या ठिकाणी हा मृतदेह टाकण्यात आला होता. मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास महापालिकेची घंटागाडी त्या ठिकाणचा कचरा उचलण्यासाठी आली होती. यावेळी कामगारांना दुर्गंधीचा त्रास जाणवल्यामुळे त्यांनी रेल्वे स्थानकाचे असिस्टंट ऑफिसर शाम चोपडे यांना कळवले. त्यानुसार चोपडे यांनी ही माहिती सीबीडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता पिशवीमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळले. मयताचे डोके, हात-पाय, छातीचा काही भाग वेगवेगळे करून पिशवीत गुंडाळेले होते. मात्र मृतदेहाचा एक हात व पोटाचा काही भाग त्यामध्ये नव्हता. शरीराच्या उर्वरित भागाचा शोध घेण्यासाठी पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, शहाजी उमाप, सहाय्यक आयुक्त धनराज दायमा व अरुण वालतुरे व सीबीडी पोलिसांनी परिसर पिंजून काढला. यावेळी कचराकुंडीपासून काही अंतरावर झाडीमध्ये मृतदेहाचा उर्वरित भाग देखील आढळला. पाऊलवाटेलगतच्या झाडीमधून दुर्गंधी येत असल्याने त्याठिकाणी पाहिले असता ते सापडले. कचराकुंडीपासून कुत्र्यांनी ते तिथपर्यंत नेल्याची शक्यता आहे. मृतदेहासोबत केवळ शर्टच्या बाह्यांचा तुकडा मिळाला आहे. मृतदेहाचे तुकडे जाणीवपूर्वक दोन ठिकाणी टाकले असल्याची देखील शक्यता उपआयुक्त शहाजी उमाप यांनी व्यक्त केली आहे.
मृताची ओळख पटेल असा कसलाही पुरावा पोलिसांना आढळलेला नाही. मयताची जीभ व डोळे बाहेर आलेले आहेत. यावरून त्याची गळा दाबून हत्या केल्यानंतर तुकडे करून टाकलेले असावेत, असेही उपाम यांनी सांगितले. मृतदेह किमान दोन दिवसांपूर्वीचा असून रात्रीच्या काळोखात त्या ठिकाणी टाकण्यात आला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

चौकट

सीसीटीव्हीची मदत
मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तिथल्या तीनपैकी एका कॅमेरामध्ये पहाटे ४च्या सुमारास तिन वाहने त्या ठिकाणी आल्याचे दिसत आहे. पार्किंगच्या ठिकाणी जाण्यासाठी देखील या मार्गाचा वापर होतो. परंतु त्यापैकी एक टेम्पो रीव्हर्स येऊन काहीच वेळात परत गेला असल्याने तिन्ही वाहनांचा शोध पोलीस घेत आहेत.

रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेला भगदाड
मृतदेह सापडलेल्या ठिकाणाजवळच रेल्वे स्थानकात जाण्याची पाऊलवाट आहे. पटरीलगतची सुरक्षा भिंत पाडून ही चोरवाट तयार करण्यात आली आहे. तिथून थेट रुळांवर अथवा स्थानकाच्या दुसर्‍या भागात देखील जाता येणे शक्य आहे. त्यामुळे मृतदेह टाकण्यासाठी या पाऊलवाटेचा वापर झाला आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
..

Web Title: Belapur Location Locals found dead body of unidentified killer: Piece of dead body was taken from the bag by trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.