लहान शहरांमध्ये हेलिकॉप्टर्सची सेवा, या राज्यांना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:50 AM2018-01-25T00:50:39+5:302018-01-25T00:50:53+5:30

ज्या शहरांत विमानाच्या टेक आॅफची सोय नाही आणि भविष्यात ती होण्याची शक्यता नाही, अशा शहरांत हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले की, अशा शहरांची यादी करण्याचे काम सुरू आहे. यासाठी किती आॅपरेटर पुढे येतात, हे पाहावे लागेल.

 Benefits of helicopters in smaller cities, these states benefit | लहान शहरांमध्ये हेलिकॉप्टर्सची सेवा, या राज्यांना फायदा

लहान शहरांमध्ये हेलिकॉप्टर्सची सेवा, या राज्यांना फायदा

Next

संतोष ठाकूर 
नवी दिल्ली : ज्या शहरांत विमानाच्या टेक आॅफची सोय नाही आणि भविष्यात ती होण्याची शक्यता नाही, अशा शहरांत हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले की, अशा शहरांची यादी करण्याचे काम सुरू आहे. यासाठी किती आॅपरेटर पुढे येतात, हे पाहावे लागेल.
हेलिकॉप्टर सेवा ईशान्य भारतात तसेच पर्वतीय भागांमध्ये सुरू होईल. यात मणिपूरमधील पाच व उत्तराखंडमधील १२ शहरे-ठिकाणे आहेत. नागरिकांना त्यांच्या शहरांत हवाईसेवा मिळावी, यासाठी खासगी मालकीच्या एअरस्ट्रीप वापरण्याचा प्रस्ताव आहे. काही ठिकाणी हवाई दलाच्या विमानतळांचाही उपयोग करण्यात येईल. अरुणाचल प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आसाममधील अनेक ठिकाणी हेलिकॉप्टर सेवा देण्याचा विचार आहे.
या राज्याला फायदा-
उडान विमानसेवेद्वारे मुंबईला बिहारच्या दरभंगा व किशनगंजशी तर केरळच्या कन्नूरशी जोडण्यात येईल. ओझर-नाशिकहून बंगळुरू-दिल्ली-हैदराबाद-गोवा-हिंडन उत्तर प्रदेश व भोपाळशी जोडण्यात येईल. सोलापूरला हैदराबाद व बंगळुरू, कोल्हापूरला कल्याण-तिरुपती-हैदराबाद-बंगळुरू व आंध्रप्रदेशातील अमरावतीला तसेच पुणे-मुंबईशी जोडले जाईल. मुंबईला कोटा, पुण्याला हुबळी, नागपूरशी तसेच अलाहाबादशी जोडले जाणार आहे.

Web Title:  Benefits of helicopters in smaller cities, these states benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.