"कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या", भाजपा नेत्याचा अजब सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 08:26 AM2020-07-19T08:26:40+5:302020-07-19T08:32:22+5:30
कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अजब सल्ला दिला आहे.
कोलकाता - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने दहा लाखांचा टप्पा पार केला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अजब सल्ला दिला आहे. पश्चिम बंगालचेभाजपा प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी एक विधान केलं आहे. लोकांना कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे.
"गोमूत्र प्यायल्याने शरीराची व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते" असं दिलीप घोष यांनी म्हटलं आहे. घोष यांनी एका बैठकीत लोकांना घरगुती गोष्टींचा उपयोग समजावून सांगितले आहेत. त्यावेळी त्यांनी गोमूत्र प्यायल्याने लोकांचं आरोग्य सुधारतं असा दावाही केला. तसेच गाढवं कधीही गायीची महती समजू शकणार नाहीत असं देखील म्हटलं आहे. त्यांच्या या अजब सल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
CoronaVirus News : लढ्याला यश! घरबसल्या करता येणार कोरोना टेस्ट, अवघ्या 20 मिनिटांत मिळणार रिझल्टhttps://t.co/pw6uhDDCce#coronavirus#CoronaUpdates#Corona#oxforduniversity
— Lokmat (@MiLOKMAT) July 18, 2020
"मी जर गायीबद्दल बोलायला लागलो तर अनेक जण अस्वस्थ होतील. गाढवं कधीही गायीची महती समजू शकणार नाहीत. हा भारत आहे. ही भगवान श्रीकृष्णाची धरती आहे. येथे आपण गायींची पूजा करतो. आपल्याला आरोग्य सुधारण्यासाठी गोमूत्र पिणं आवश्यक आहे. जे दारू पितात त्यांना गायीचं महत्त्व कसं काय लक्षात येईल" असं दिलीप घोष यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! हादरवणाऱ्या रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक https://t.co/9wJqNWKxAx#coronavirus#CoronaUpdates
— Lokmat (@MiLOKMAT) July 18, 2020
दिलीप घोष यांनी याआधीही अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहे. ते नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. गायीच्या दुधामध्ये सोनं असतं. त्यामुळेच ते सोनेरी दिसत असल्याचा दावा ही त्यांनी याआधी केला होता. तसेच देशी गायी आणि विदेशी गायींची त्यांनी तुलना केली. 'विदेशी गाय नाही तर फक्त देशी गाय आपली आई आहे. ज्या लोकांची पत्नी विदेशी आहे. ते आता कठिण परिस्थितीत आहेत' असं दिलीप घोष यांनी म्हटलं होतं.
अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच झालं नाही तयार शेवटी...; मन सुन्न करणारी घटनाhttps://t.co/A4XTya65al#Corona#coronavirus#Death
— Lokmat (@MiLOKMAT) July 18, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनाग्रस्त चिमुकल्यांमध्ये दिसताहेत 'या' गंभीर आजाराची लक्षणं
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! ऑक्सफर्डला मिळालं आणखी एक मोठं यश
काय सांगता? Google लवकरच फूड डिलिव्हरी क्षेत्रात एंट्री करणार, 'या' लोकप्रिय कंपन्यांना टक्कर देणार
कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नीने केले अंत्यसंस्कार
CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! 100 तासांत तब्बल 10 लाख नवे रुग्ण, धडकी भरवणारी आकडेवारी