बंगालमध्ये गोरखा जनमुक्ती आंदोलन भडकले, लष्कराला पाचारण

By admin | Published: June 8, 2017 10:02 PM2017-06-08T22:02:33+5:302017-06-08T22:02:33+5:30

श्चिम बंगालमध्ये सुरू असलेले गोरखा जनमुक्तीच्या समर्थकांनी सुरू केलेले आंदोलन चिघळले आहे. दार्जिलिंग परिसरात आंदोलकांनी

In Bengal, the Gorkha Janmukti movement was stirred, called for the Army | बंगालमध्ये गोरखा जनमुक्ती आंदोलन भडकले, लष्कराला पाचारण

बंगालमध्ये गोरखा जनमुक्ती आंदोलन भडकले, लष्कराला पाचारण

Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 8 -  पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेले गोरखा जनमुक्तीच्या समर्थकांनी सुरू केलेले आंदोलन चिघळले आहे. दार्जिलिंग परिसरात आंदोलकांनी हिंसाचार माजवला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्य्यात आले आहे. 
प्रक्षुब्ध झालेल्या गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या समर्थकांनी आज सरकारी कार्यालयांना आपले लक्ष्य केले. अनेक ठिकाणी सरकारी मालमत्तांना आग लावण्यात आली. तसेच आंदोलकांनी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या राज्य पोलिसांवर दगडफेक केली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आंदोलकांनी आतापर्यंत पाच जीप, एक सरकारी बस आणि 12 कारची जाळपोळ केली आहे. या आंदोलकांनी दगडफेक केल्यावर पोलिसांनी त्यांना थोपवण्यासाठी लाठीमार केला, तसेच अश्रुधूराच्या नळ्यांचा मारा केला.  
  डीआयजी राजेश यादव, एडीजी पश्चिम बंगाल आणि एसपी दार्जिलिंग अमित जवालगी हेसुद्धा या आंदोलनात जखमी  झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत  एक काँन्स्टेबल गंभीर जखमी झाला आहे. आंदोलकांनी फेकलेला दगड या काँन्स्टेबलच्या डोळ्याला लागला आहे.  

Web Title: In Bengal, the Gorkha Janmukti movement was stirred, called for the Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.