Momo Challenge : भारतात दुसरा बळी, मोमो चॅलेंजविरोधात बंगाल सरकार कारवाईच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 10:19 AM2018-08-27T10:19:57+5:302018-08-27T10:39:43+5:30
Momo Challenge: ब्लू व्हेल गेम आणि किकी चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर मोमो चॅलेंज हा जीवघेणा खेळ जोरदार व्हायरल होत आहे.
कोलकत्ता - ब्लू व्हेल गेम आणि किकी चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर मोमो चॅलेंज हा जीवघेणा खेळ जोरदार व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा धोकादायक गेम सर्वत्र पसरत आहे. मोमो चॅलेंजमुळे आतापर्यंत भारतात दोन बळी गेल्याचे वृत्त समोर आले आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रामख्याने या दोन आत्महत्या झाल्यामुळे या समस्येचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आता पुढाकार घेतला आहे.
सावधान! ब्लू व्हेल आणि किकी चॅलेंजपेक्षा धोकादायक आहे 'हा' खेळ
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने सर्व शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांच्या कृतीकडे लक्ष देण्यास ही सांगितले आहे. मोमो चॅलेंजच्या जाळ्यात अनेक विद्यार्थी अडकत असल्याने या धोकादायक खेळाचा सामना करण्याचं आवाहन आता प्रशासनासमोर आहे.
सावधान... ती म्हणाली, मला जीव द्यावासा वाटतोय; अन् मोमो चॅलेंजसाठी मेसेज आला!
तरुणांनी या चॅलेंजसाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. दार्जिलिंगच्या कुर्सियांगमध्ये मनिष सर्की (18) आणि आदिती गोयल (26) या दोघांनी मोमो चॅलेंज स्विकारत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतरच बंगाल सरकारने याबाबत कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
असं आहे मोमो चॅलेंज
- सर्वप्रथम यूजरला एक अनोळखी नंबर मिळतो. तो मोबाइलमध्ये सेव्ह केल्यानंतर Hi-Hello करण्याचं चॅलेंज दिलं जातं.
- अनोळखी नंबरवर त्यानंतर युजरला बोलण्याचे चॅलेंज दिले जाते.
- या नंबरवरून पुढे युजर्सला चित्रविचित्र घाबरवणारे फोटो आणि व्हिडीओ क्लिप पाठवल्या जातात.
- मोमो चॅलेंजमध्ये पुढे युजर्सना काही टास्क दिले जातात. ते पूर्ण केले नाहीत तर त्यांना धमकावलं जातं.