बंगालचा आंबा दुबई, हाँगकाँग, मलेशियात

By Admin | Published: June 29, 2016 04:29 AM2016-06-29T04:29:22+5:302016-06-29T04:29:22+5:30

प. बंगालच्या बांकुरा जिल्ह्यातील फारसा परिचित नसलेला आम्रपाली आंबा आता थेट दुबई, हाँगकॉग आणि मलेशियाच्या बाजारपेठा काबीज करणार आहे.

Bengal mango in Dubai, Hong Kong, Malaysia | बंगालचा आंबा दुबई, हाँगकाँग, मलेशियात

बंगालचा आंबा दुबई, हाँगकाँग, मलेशियात

googlenewsNext


कोलकाता : प. बंगालच्या बांकुरा जिल्ह्यातील फारसा परिचित नसलेला आम्रपाली आंबा आता थेट दुबई, हाँगकॉग आणि मलेशियाच्या बाजारपेठा काबीज करणार आहे. या हंगामात दुबईतून आठ मेट्रिक टन आम्रपाली आंब्याची मागणी झाल्याचे फलोत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अलीकडील काही वर्षांपासून हळूहळू आम्रपाली आंब्याला देशात मागणी वाढत असून त्याच्या खास चवीमुळे लोकप्रियता वाढत आहे. देशभरातील विविध जातींच्या आंब्याची विदेशात निर्यात केली जाते मात्र यावेळी बांकुरामधील एखाद्या आंब्याच्या जातीची निर्यात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. प. बंगालमध्ये माल्दा आणि मुर्शिदाबादचे आंबे अधिक प्रसिद्ध आहेत. आम्ही बांकुरा हा नवा ब्रँड निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहोत, असे या अधिकाऱ्यांनी नमूद केले. (वृत्तसंस्था)
बांकुरात १३० टन उत्पादन
यावर्षी आम्रपाली जिल्ह्यांत आंब्यांच्या ७३० बागांमधून १३० टन आंबा उत्पादन झाले. दामादोरपूर येथे सर्वाधिक आंबा पिकविला जातो. गेल्यावर्षी कोलकात्याच्या फलोत्पादन मेळ्यात बांकुऱ्याच्या आम्रपाली आंब्याने प्रथम क्रमांक पटकावला होता. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंबा महोत्सवात आम्रपालीचा बोलबाला आहे.

Web Title: Bengal mango in Dubai, Hong Kong, Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.