शालेय पाठ्यपुस्तकात घोडचूक, मिल्खा सिंग म्हणून फरहानचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 09:47 AM2018-08-20T09:47:05+5:302018-08-20T09:56:09+5:30

शालेय पाठ्यपुस्तकात 'फ्लाईंग शिख' धावपटू मिल्खा सिंग म्हणून चक्क अभिनेता फरहान अख्तरचा फोटो छापला आहे.

Bengal school book mistakes Farhan Akhtar for Milkha Singh. | शालेय पाठ्यपुस्तकात घोडचूक, मिल्खा सिंग म्हणून फरहानचा फोटो

शालेय पाठ्यपुस्तकात घोडचूक, मिल्खा सिंग म्हणून फरहानचा फोटो

Next

कोलकाता: पश्चिम बंगालमधील शालेय पाठ्यपुस्तकात झालेली घोडचूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  येथील शालेय पाठ्यपुस्तकात 'फ्लाईंग शिख' धावपटू मिल्खा सिंग म्हणून चक्क अभिनेता फरहान अख्तरचा फोटो छापला आहे. त्यामुळे सध्या हा विषय चर्चेचा ठरला आहे. 
दरम्यान, धावपटू मिल्खा सिंग यांच्या फोटोऐवजी फरहान अख्तरचा फोटो छापल्याचा प्रकार लक्षात येताच अभिनेता फरहान अख्तरने स्वत: याबद्दल ट्विट करत नाराजी व्यक्त केली. तसेच, पश्चिम बंगालच्याशिक्षणमंत्र्यांकडे हा चुकीचा छापण्यात आलेला फोटो बदलण्याचीही विनंती केली आहे. यावर, पश्चिम बंगालचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी सांगितले की, फरहान अख्तर यांनी केलेल्या ट्विटबद्दल माहिती मिळाली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, या चुकीबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 




दरम्यान, ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटातफरहान अख्तरने मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेमुळे पाठ्यपुस्तकात मिल्खा सिंग ऐवजी फरहान अख्तरचा चुकीचा फोटो छापण्यात आल्याचे दिसून येते. भारतीय क्रीडा क्षेत्रात मिल्खा सिंग यांचे मोठे योगदान आहे. धावपटू म्हणून त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद  आहे. 1958 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकावले होते. 

Web Title: Bengal school book mistakes Farhan Akhtar for Milkha Singh.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.