प. बंगाल हिंसाचार: गृहमंत्रालयानं राज्य सरकारकडून मागवला सविस्तर अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 18:45 IST2023-04-04T18:44:50+5:302023-04-04T18:45:20+5:30
हावडा येथे रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराचा गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून सविस्तर अहवाल मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प. बंगाल हिंसाचार: गृहमंत्रालयानं राज्य सरकारकडून मागवला सविस्तर अहवाल
पश्चिम बंगालच्या हावडा येथे रामनवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचा केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस यांच्याशी बोलून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. विशेषत: हावडा येथील हिंसाचारग्रस्त भागाची शाह यांनी माहिती जाणून घेतली आहे.
हावडा येथे रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराचा गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून सविस्तर अहवाल मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली. ३० मार्च रोजी राम नवमीच्या उत्सवादरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. अनेक वाहनं जाळण्यात आली आणि परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली होती.
हावडा येथील हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत ३० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.