Sumitra Sen : प्रसिद्ध बंगाली गायिका सुमित्रा सेन यांचं निधन; आयुष्यभर रविंद्र संगीताचा केला प्रसार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 11:09 AM2023-01-03T11:09:57+5:302023-01-03T11:11:45+5:30
बंगालच्या प्रख्यात गायिका सुमित्रा सेन यांचे यांचं आज निधन झालं. कोलकात्याच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Sumitra Sen : बंगालच्या प्रख्यात गायिका सुमित्रा सेन यांचे यांचं आज निधन झालं. कोलकात्याच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी रवींद्र संगीत कलाकार श्रावणी सेन यांनी यासंदर्भात माहिती दिली. आज आई हे जग सोडून गेली अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली.
सुमित्रा सेन या 'ब्रोन्कोपमोनिया' आजाराने त्रस्त होत्या. अचानक थंडी वाजत असल्याने २० डिसेंबरला त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची तब्येत आणखी गंभीर होत होती त्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हत्या. यामुळे त्यांना कुटुंबीय घरी घेऊन गेले. आज त्यांचे राहत्या घरी निधन झाले.
सुमित्रा सेन या बंगाली रविंद्र संगीत आणि बंगाली संगीतात पारंगत होत्या. त्यांच्या घराण्याने रवींद्रनाथ टागोर यांच्या संगीताचा प्रसार केला. सेन यांच्या सुमधुर आवाजाचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या जाण्याने चाहते दु:ख व्यक्त करत आहेत. मेघ बोले छे जाबो जाबो, भारा थक स्मृती सुधाय, तोमर द्वारे केनो ऐसी, दु:ख जडी ना पाबे तो अशी अनेक त्यांची लोकप्रिय गाणी आहेत.