दारूसाठी पैसे दिले नाहीत; मुलानं केला आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 11:49 AM2018-12-10T11:49:42+5:302018-12-10T11:54:31+5:30

मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना बंगळुरू येथे घटना घडली आहे. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून रागाच्या भरात एका मुलानं आपल्या आईलाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

Bengaluru : 20-year-old man allegedly tried to set ablaze his mother for not giving him money to buy alcohol | दारूसाठी पैसे दिले नाहीत; मुलानं केला आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

दारूसाठी पैसे दिले नाहीत; मुलानं केला आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देपैसे देण्यास नकार दिला म्हणून मुलाचा आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्नमहिला गंभीर जखमी, आरोपी मुलगा फरारदारूसाठी मुलानं आईला जाळलं?

बंळगुरू - मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना बंगळुरू येथे घटना घडली आहे. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून रागाच्या भरात एका मुलानं आपल्या आईलाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं या घटनेत पीडित महिला थोडक्यात बचावली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आरोपी मुलाचं नाव उत्तम कुमार (20 वर्ष) असून या घटनेनंतर तो फरार झाला आहे.  

ही थरकाप उडवणारी घटना बंगळुरूतील सदाशिवनगर परिसरात 6 डिसेंबर रोजी घडली आहे. पैशांवरुन आई-मुलामध्ये प्रचंड वादावादी झाली. आरोपी उत्तम कुमारनं आईकडे पैशांची मागणी केली. पण मुलगा दारूवर पैसे खर्च करणार, या संशयातून आईनं त्याला पैसे देण्यात नकार दिला. 

यामुळे संतापाच्या भरात त्यानं आईवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिलेच्या पतीनं तातडीनं तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा चेहरा, हात आणि छातीच्या भागाला गंभीर जखमा झाल्या आहेत.
blockquote class="twitter-tweet" data-lang="en">

Sadashivanagar, #Bengaluru: Uttam Kumar a 20-year-old man allegedly tried to set ablaze his mother for not giving him money to buy alcohol. The woman has been admitted to hospital. Case registered, Kumar is on the run. pic.twitter.com/9Sr5nqalGg

— ANI (@ANI) December 9, 2018

यापूर्वीही अशाच प्रकारची हृदयद्रावक घटना समोर आली होती. शेजाऱ्यांसमोर आई अंगावर ओरडली म्हणून एका व्यक्तीनं आपल्या आईला चक्क झाडूनं अमानूष मारहाण केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला.

Web Title: Bengaluru : 20-year-old man allegedly tried to set ablaze his mother for not giving him money to buy alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.