...अन् दिशा रवीची थेट अजमल कसाबसोबत तुलना, भाजपा नेत्याचं 'ते' ट्विट जोरदार व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 12:50 PM2021-02-15T12:50:19+5:302021-02-15T12:59:57+5:30
BJP PC Mohan And Disha Ravi : मोदी सरकारवर या प्रकरणावरून अनेकांनी हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याचं ट्विट जोरदार व्हायरल झालं आहे.
नवी दिल्ली: ग्रेटा थनबर्ग टूलकिट (Greta Thunberg) प्रकरणात बंगळुरू येथून अटक करण्यात आलेली पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी (Disha Ravi ) हिला रविवारी दिल्ली पोलिसांनी कोर्टात हजर केले. कोर्टाने तिला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. दिशाच्या अटकेवरून राजकारण तापायला सुरुवात झाली असून अनेकांनी तिच्या अटकेला विरोध केला आहे. मोदी सरकारवर या प्रकरणावरून अनेकांनी हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याचं ट्विट जोरदार व्हायरल झालं आहे. ट्विटमध्ये नेत्याने अजमल कसाब सोबत दिशा रवीची तुलना केली आहे.
भाजपाचे वरिष्ठ नेता आणि बंगळुरू सेंट्रलचे खासदार पीसी मोहन (PC Mohan) यांनी दिशा रवीची तुलना थेट 26/11च्या हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब आणि बुरहान वानीसोबत केली आहे. पीसी मोहन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे, "बुरहान वानीदेखील 21 वर्षाचा होता. अजमल कसाबही 21 वर्षाचा होता. वय ही फक्त एक संख्या आहे. कोणीही कायद्यापेक्षा वरचढ नाही. कायद्याला आपलं काम करू द्या. गुन्हा हा नेहमी गुन्हाच असतो" असं मोहन यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या या ट्वीटमध्ये त्यांनी #DishaRavi असं देखील लिहिलं असून दिशा रविचा एक फोटोही ट्वीट केला आहे. भाजपा नेत्याच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
Burhan Wani was a 21-year-old.
— P C Mohan (@PCMohanMP) February 14, 2021
Ajmal Kasab was a 21-year-old.
Age is just a number!
No one is above the law.
Law will take its own course.
A Crime is a crime is a crime is a crime.#DishaRavipic.twitter.com/m6eRwAnMuf
"एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरले", दिशाच्या अटकेवर प्रियंका गांधी कडाडल्या
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिशा रवीच्या अटकेनंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. "एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरत आहेत" अशी घणाघाती टीका प्रियंका यांनी केली आहे. "डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से, फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से" अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी दिशा रवीच्या अटकेचा निषेध केला आहे. अटकेवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच ReleaseDishaRavi, DishaRavi IndiaBeingSilenced हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
दिशा रवीच्या अटकेवरून राजकारण तापलं; प्रियंका गांधींचा मोदी सरकारला सणसणीत टोलाhttps://t.co/pC9J8IEVzJ#PriyankaGandhi#Congress#DishaRavi#arrest#ModiGovtpic.twitter.com/6Lax915m41
— Lokmat (@MiLOKMAT) February 15, 2021
"कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल", दिशाच्या अटकेवरून शशी थरूर यांचा मोदी सरकारवर घणाघात
काँग्रेसचे नेते शशी थरूर (Shashi Tharoor)यांनी देखील आता दिशाच्या अटकेचा विरोध केला आहे. "कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल" असं म्हणत मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शशी थरूर यांनी जम्मू-काश्मीरचे निलंबित डीएसपी देविंदर सिंह यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. शशी थरूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. देविंदर सिंह यांच्या फोटोसह दिशाला अटक झाल्याची बातमी सांगणारा एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. "कार्यकर्ते तुरुंगात बंद आहेत तर दहशतवादाचा आरोप असलेले जामिनावर बाहेर... आमचे अधिकारी पुलवामा हल्ल्याची आठवण कशी काढतील याचा विचार करताय?… खालच्या दोन शीर्षकांमध्ये उत्तर मिळेल" असं शशी थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुलवामा हल्ल्यातील कटामध्ये देविंदर सिंह यांचं नाव आलं होतं, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. आता ते जामिनावर बाहेर आहेत.
दिशा रवीच्या अटकेवरून शशी थरूर संतापले, म्हणाले...https://t.co/ISk17eeUCq#shashitharoor#Congress#DishaRavi#Toolkit#ModiGovtpic.twitter.com/JNv3FU1eJ0
— Lokmat (@MiLOKMAT) February 15, 2021
देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेली दिशा रवी नेमकी आहे कोण?
दिशा रवी 22 वर्षांची आहे. बंगळुरूतल्या माऊंट कॅर्मेल महाविद्यालयातून तिनं पदवी घेतली आहे. हवामान विषयावर काम करणाऱ्या 'फ्रायडे फॉर फ्युचर' संस्थेत दिशाचा सहभाग आहे. या संस्थेची स्थापना ग्रेटा थनबर्गनं 2018 मध्ये केली. या संस्थेची भारतीय शाखा दिशानं 2019 मध्ये सुरू केली. या शाखेचं नेतृत्त्व दिशा करते. हवामान बदलासंदर्भात दिशानं देशभरात अनेक उपक्रम राबवले आहेत. हवामान बदलाविषयी दिशानं बंगळुरूत अनेक आंदोलनं केली आहेत. हवामान बदलाचे पर्यावरणावर होणारे प्रतिकूल परिणाम याबद्दल दिशानं जगभरातील अनेक माध्यमांमध्ये लिखाण केलं आहे.
दिशावर कोणकोणते गुन्हे दाखल?
दिशाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वेष भावना निर्माण करण्यासाठी कारस्थान रचल्याचा गुन्हादेखील तिच्याविरोधात नोंदवला गेला आहे. दिशाला रविवारी अटक करण्यात आली. तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं तिला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
"भारत मूर्खपणाची रंगभूमी बनतोय", चिदंबरम यांचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल https://t.co/Q316OJjMyj#PChidambaram#DishaRavi#ToolkitCase#Congress#ModiGovtpic.twitter.com/zHW3faavUP
— Lokmat (@MiLOKMAT) February 15, 2021