कडक सॅल्यूट! 'मजुरांच्या मुलांवर मजुरीची वेळ येऊ नये म्हणून...', शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 04:46 PM2020-09-08T16:46:06+5:302020-09-08T17:38:24+5:30

कोरोनाच्या संकटात पोलीस आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करत आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसाना होऊ नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

bengaluru sub inspector teaches children of migrant workers | कडक सॅल्यूट! 'मजुरांच्या मुलांवर मजुरीची वेळ येऊ नये म्हणून...', शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार

कडक सॅल्यूट! 'मजुरांच्या मुलांवर मजुरीची वेळ येऊ नये म्हणून...', शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान शाळा महाविद्यालये बंद असून ऑनलाईन क्लासेस अनेक ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. मात्र घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच काही गरीब विद्यार्थ्यांसाठी एक पोलीस अधिकारी देवदूत ठरले आहेत. 

कोरोनाच्या संकटात पोलीस आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करत आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. शांथप्पा जीदमनव्वर असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. कर्नाटकच्या बंगळुरूमधील अन्नपूर्णेश्वरी नगर परिसरात पोलीस उप-निरीक्षक शांथप्पा हे मजुरांच्या मुलांना मोफत शिकवत आहेत. ज्या मुलांकडे स्मार्टफोन, लॅपटॉप नाही अशा विद्यार्थ्यांना ते वेळात वेळ काढून शिकवतात. 

शांथप्पा हे ड्यूटीवर जाण्याआधी मुलांना शिकवतात. रस्त्यावर मुलांच्या शिकवणीचा वर्ग भरतो. मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून ते मेहनत घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते नियमितपणे मुलांना शिकवत आहेत. मजुरांच्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून ते प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांना शिकवतानाचे त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. तसेच सर्वत्र त्यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. 

"प्रवासी मजुरांच्या मुलांना देखील शिक्षणाचा अधिकार आहे. काही कारणास्तव ते शाळेत जाऊ शकत नाहीत. ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाहीत ही त्यांची चूक नाही. मजुरांच्या मुलांवर मजुरीची वेळ येऊ नये तर त्यांनी शिकून यश मिळवावं. त्यांना उत्तम शिक्षण मिळावं" असं शांथप्पा जीदमनव्वर यांनी म्हटलं आहे. ट्विटरवर अनेकांनी शांथप्पा यांचे फोटो शेअर करून त्यांना रियल सिंघम म्हटलं आहे. त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा", रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका 

"मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न", राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

CoronaVirus News : आशेचा 'किरण'! मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी मोदी सरकारकडून हेल्पलाईन सुरू

CoronaVirus News : ...म्हणून देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्याचा घेतला निर्णय

नवा ट्विस्ट! सुशांतच्या बहिणींविरोधात रिया चक्रवर्तीची पोलिसांत तक्रार; केले 'हे' आरोप

Web Title: bengaluru sub inspector teaches children of migrant workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.