बापरे! 1000 बस, 5000 गाड्या... बंगळुरूमध्ये मध्यरात्री वाहतूक कोंडीत अडकले 2.5 लाख लोक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 02:07 PM2023-11-12T14:07:39+5:302023-11-12T14:08:16+5:30
बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अनेकदा पाहायला मिळते, मात्र यावेळी वाहतूक कोंडीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
दिवाळीच्या निमित्ताने बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अनेकदा पाहायला मिळते, मात्र यावेळी वाहतूक कोंडीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. शुक्रवारी रात्री 1000 हून अधिक बस आणि 50 हजार इतर वाहनं या वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती, ज्यामध्ये सुमारे 2.5 लाख लोक होते. ही वाहनं रात्री 8 ते मध्यरात्री 2 या वेळेत शहरातील रस्त्यांवर येऊन वेगवेगळ्या दिशेने जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली.
TOI च्या रिपोर्टनुसार, बंगळुरूचे वाहतूक आयुक्त एमएन अनुचेथ यांनी दिेलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी दिसली त्यात सॅटेलाइट बस स्टँड आणि म्हैसूर रोडवरील विविध बस टर्मिनल होते. ज्या ठिकाणी बस स्टँड किंवा पिकअप पॉईंट आहेत, तिथे आम्ही लोकांना रस्त्यावर येण्यापासून रोखण्यासाठी आणि वाहतूक नीट सुरू राहावी यासाठी बॅरिकेड्स लावतो.
दररोज होते वाहतूक कोंडी
डीसीपी (वाहतूक) सचिन घोरपडे यांनी सांगितलं की, शनिवारी सकाळी पुन्हा एकदा वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली. मात्र पूर्वीपेक्षा कमी वाहनं होती. बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडी होण्याची ही पहिलीच वेळ नाही, येथे दररोज ट्रॅफिक पाहायला मिळतं आणि यात वाहने अडकून राहतात. वाहतूक कोंडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामुळे लोकांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो.