विचार कुंभ बंधूप्रेमाचे उत्तम उदाहरण बलराम
By admin | Published: September 10, 2015 04:46 PM2015-09-10T16:46:24+5:302015-09-10T16:46:24+5:30
नाशिक : श्रीराम लक्ष्मणाचे जसे बंधूप्रेम आदर्श होते तसेच श्रीकृष्ण आणि बलराम हे बंधूप्रेमाचे उत्तम उदाहरण होते. रामायणात लहान भाऊ लक्ष्मण श्रीरामाच्या मागे सावलीसारखा उभा होता. तसाच महाभारतात मोठा बंधू बलरामदादा हा श्रीकृष्णाच्या पाठीशी उभा राहत असे. त्यांच्या अनेक तात्त्विक मतभेद होते. तरीही त्यांचे एकमेकांवरील प्रेम अजिबात कमी झाले नाही. वृंदावनातील जनतेचे तर बलरामदादावर अधिक प्रेम होते. शेजारचे राजेही श्रीकृष्णापेक्षा बलरामलाच घाबरत होते, असेही प्रतिपादन श्याम पराशर शास्त्री यांनी केले. श्रीलक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट आणि विष्णूप्रसाद पोद्दार व पोद्दार परिवार यांच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण बडा मंदिर लॉन्स येथे श्रीमद् भागवत महाकथा पुराणाच्या समारोपप्रसंगी भागवत प्रवचनात ते बोलत होते. यावेळी शास्त्री म्हणाले की, श्रीकृष्णाने अर्जुनाची बाजू घेतली आणि बलराम
Next
न शिक : श्रीराम लक्ष्मणाचे जसे बंधूप्रेम आदर्श होते तसेच श्रीकृष्ण आणि बलराम हे बंधूप्रेमाचे उत्तम उदाहरण होते. रामायणात लहान भाऊ लक्ष्मण श्रीरामाच्या मागे सावलीसारखा उभा होता. तसाच महाभारतात मोठा बंधू बलरामदादा हा श्रीकृष्णाच्या पाठीशी उभा राहत असे. त्यांच्या अनेक तात्त्विक मतभेद होते. तरीही त्यांचे एकमेकांवरील प्रेम अजिबात कमी झाले नाही. वृंदावनातील जनतेचे तर बलरामदादावर अधिक प्रेम होते. शेजारचे राजेही श्रीकृष्णापेक्षा बलरामलाच घाबरत होते, असेही प्रतिपादन श्याम पराशर शास्त्री यांनी केले. श्रीलक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट आणि विष्णूप्रसाद पोद्दार व पोद्दार परिवार यांच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण बडा मंदिर लॉन्स येथे श्रीमद् भागवत महाकथा पुराणाच्या समारोपप्रसंगी भागवत प्रवचनात ते बोलत होते. यावेळी शास्त्री म्हणाले की, श्रीकृष्णाने अर्जुनाची बाजू घेतली आणि बलरामाने दुयार्ेधनाला गदा युद्धात पारंगत केले तरीही दोन्ही बंधूंना कौरव पांडव एकत्र रहावे, असे सुरवातीपासून वाटत होते. नंतर पुढे महाभारत घडले. बलरामाच्या शक्तीचा प्रत्यय अनेक राजांना आला होता. अगदी यमुना नदीलादेखील बलरामाच्या शक्तीपुढे वाकावे लागले होते. कारण एकदा आपल्या सवंगड्यासमवेत बलराम स्नानासाठी यमुनेजवळ गेले तेव्हा त्यांनी यमुना इकडे ये असे म्हटले, परंतु यमुना येईना म्हणून आपल्या नांगराने यमुनाला ओढले त्यामुळेच वृंदावनानजीक यमुनेचा प्रवाह वाकडा तिकडा आहे, असेही महाराज म्हणाले.