‘कोर्ट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

By admin | Published: March 25, 2015 01:49 AM2015-03-25T01:49:01+5:302015-03-25T01:49:01+5:30

चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. सुवर्णकमळ आणि अडीच लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Best Film to Become 'Court' | ‘कोर्ट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

‘कोर्ट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

Next

‘एलिझाबेथ एकादशी’ सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : हिंदी चित्रपटांत ‘क्वीन’ ची बाजी, कंगना सर्वश्रेष्ठ अभिनेत्री
नवी दिल्ली : चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. सुवर्णकमळ आणि अडीच लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या चित्रपटात देशातील न्याय व्यवस्थेतील विसंगतींवर नेमके बोट ठेवले आहे.
सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मराठी चित्रपट ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि तामिळ चित्रपट ‘काक्का मुतई’ या दोन चित्रपटांना संयुक्तरूपात देण्यात आला.
६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा मंगळवारी येथे करण्यात आली. ३ मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल.
हिंदीत ‘क्वीन’ या चित्रपटाने आपला दबदबा कायम राखत सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. या चित्रपटातील अभिनयासाठी कंगना रानावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.
महिला बॉक्सर मेरी कोम हिच्या जीवनावर आधारित आणि प्रियंका चोपडा अभिनीत ‘मेरी कोम’ चित्रपटाला सर्वश्रेष्ठ लोकप्रिय मनोरंजक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. विशाल भारद्वाज
दिग्दर्शित ‘हैदर’ने सर्वोत्कृष्ट संगीतकार, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार आणि सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी असे पाच पुरस्कार पटकाविले.
‘हैदर’मधील ‘बिस्मील’ गीतासाठी सुखविंदर सिंह सर्वोत्कृष्ट गायक, वेशभूषेसाठी डॉली अहलूवालिया आणि सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीसाठी सुदेश अदाना यांना पुरस्कार जाहीर झाले.‘नानू अवन्नला अवलू’ कन्नड चित्रपटातील भूमिकेसाठी कन्नड अभिनेता विजय याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. तर बांगला चित्रपट ‘चतुष्कोण’साठी श्रीजित मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. ‘चतुष्कोण’ने सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी आणि सवोत्कृष्ट स्क्रीनप्ले या दोन पुरस्कारांवरही आपले नाव कोरले.

अन्य पुरस्कार
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सृजित मुखर्जी (बंगाली चित्रपट चतुष्कोण)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : बॉबी सिन्हा (तामिळ चित्रपट जिगरठंडा)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री :बलजिंदर कौर (हरियाणी चित्रपट पगडी द आॅनर)
सर्वोष्कृष्ट पार्श्वगायक- सुखविंदर सिंह(हैदरमधील बिस्मील या गाण्यासाठी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिक : उत्तरा उन्नीकृष्णन (साईवम या तामिळ चित्रपटातील अजहागू गीतासाठी)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन : विशाल भारद्वाज (हैदरमधील गाण्यांसाठी)

Web Title: Best Film to Become 'Court'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.